India Tour of England : मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर इंग्लंडला परतला; काय आहे संघात वातावरण?

India Tour of England : आईची तब्येत बिघडल्यामुळे गंभीर भारतात परतला होता. 

48
India Tour of England : मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर इंग्लंडला परतला; काय आहे संघात वातावरण?
  • ऋजुता लुकतुके

आपल्या आईला ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर मध्यंतरी भारतात परतला होता. एक आठवडा आईबरोबर राहिल्यानंतर आता गंभीर भारतीय संघात परतला आहे. मंगळवारी सकाळी गंभीर लंडनमध्ये परतला. पहिली कसोटी लीड्स इथं २० तारखेपासून सुरू होणार आहे. (India Tour of England)

१३ जूनला गंभीर नवी दिल्लीत घरी परतला होता. त्याची आई ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे एका खाजगी रुग्णालयात अतीदक्षता विभागात होती. तिच्याबरोबर ५ दिवस राहिल्यानंतर गंभीर आता लंडनला परतला आहे. गंभीर नसताना भारतीय संघ ए संघाबरोबर चार दिवसांचा एक सराव सामना खेळला. बेकेंघम इथं झालेल्या या सामन्यात के. एल. राहुल, करुण नायर, अभिमन्यू ईश्वरन आणि सर्फराझ खान यांनी फलंदाजीची संधी साधली. तर गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव चमकले. शार्दूल ठाकूरने दुहेरी चमक दाखवताना शतकही ठोकलं आणि एका डावांत ३ बळीही मिळवले. गंभीर संघाबरोबर नसताना सितांशू कोटक, रायन टेन ड्युसकाटे आणि मॉर्नी मॉर्केल या सहाय्यक प्रशिक्षकांच्या ताफ्याने सरावावर लक्ष ठेवलं. (India Tour of England)

(हेही वाचा – Air India च्या अहमदाबाद-लंडन विमानात पुन्हा मोठा बिघाड, ऐनवेळी विमान रद्द!  )

विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीनंतर भारतीय संघात दोन मोठे खड्डे बुजवायचे आहेत. फलंदाजीचा क्रम नेमका काय असणार यावर सध्या संघाअंतर्गत खल सुरू आहे. शुभमन गिलची पसंती तिसऱ्या क्रमांकाला आहे. पण, के. एल. राहुल आणि यशस्वी जयस्वाल सलामीला आले तर तिसऱ्या क्रमांकावर अभिमन्यू ईश्वरन किंवा साई सुदर्शनला खेळवण्याची शक्यता जास्त वाटते. त्या परिस्थितीत शुभमन गिलला विराट कोहलीचा चौथा क्रमांक भरून काढावा लागेल. पाचव्या क्रमांकावर करुण नायर असेल. (India Tour of England)

गोलंदाजांमध्येही जसप्रीत बुमराह नेमका कुठल्या तीन कसोटी खेळणार आणि त्याच्या जोडीला सिराजबरोबर तिसरा तेज गोलंदाज कुठला असणार हा प्रश्नही भारतीय संघासमोर आहे. फिरकीपटू म्हणून कुलदीप यादवची जागा पक्की वाटत आहे. हे सगळे निर्णय येत्या दोन दिवसांत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला घ्यायचे आहेत. (India Tour of England)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.