मिठी नदीला जोडणाऱ्या नाल्यात थर्माकोल, बॉक्स; BMC ने औद्योगिक कचरा टाकणाऱ्यांविरोधात केली पोलिस तक्रार दाखल

374
मिठी नदीला जोडणाऱ्या नाल्यात थर्माकोल, बॉक्स; BMC ने औद्योगिक कचरा टाकणाऱ्यांविरोधात केली पोलिस तक्रार दाखल
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

मुंबई महानगरपालिकेने (BMC) पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाल्यांमध्ये औद्योगिक कचरा टाकणाऱ्यांविरुद्ध कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या प्रकारामुळे नाले तुंबण्याचा धोका निर्माण होत असून, परिणामी शहरात पाणी साचण्याची समस्या वाढत आहे. धारावी येथील मिठी नदी आणि नाला जोडणाऱ्या टी जंक्‍शन नाला स्‍वच्‍छ केल्‍यानंतरही त्‍यात औद्योगिक कचरा मोठ्या प्रमाणावर टाकल्‍याचे आढळून आले आहे. याची गंभीर दखल घेत महानगरपालिका प्रशासनाने शाहुनगर पोलिस ठाण्‍यात तक्रार दाखल केली आहे. या तरंगत्या कचऱ्यात थर्माकोल, बॉक्स, फ्रीजच्या आतील भागातील फोम आदींचा मोठ्या प्रमाणात समावेश असून, भंगार दुकान, फ्रीज दुरुस्त करणारे व्यावसायिक आणि इलेक्ट्रॉनिक्स दुकान आदींमधून हा कचरा टाकण्यात आला आहे. अनधिकृतपणे चालविले जाणारे भंगार दुकान आणि इतर गाळ्यांवर महापालिका कधी बुलडोझर चालवणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. (BMC)

पावसाळी कामांचा भाग म्‍हणून, मुंबई महानगरातील नद्या आणि नाल्‍यांमधील गाळ काढण्‍यात येत आहे. गाळ काढण्‍याचे काम नियोजनबद्ध पद्धतीने सुरु असून या कामी कृत्रिम बुद्धिमत्ता (ए. आय.) प्रणालीचा वापर केला जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून गाळ काढण्याच्या कामात परिणामकारकता व पारदर्शकता यामध्ये वाढ होण्यास मोठी मदत होत आहे. मोठ्या व छोट्या नाल्‍यांमधील गाळ काढण्‍याचे काम पूर्ण झाले असले तरी भरतीसोबत तरंगता कचरा जमा झाल्‍यामुळे नालेसफाई वारंवार करावी लागत आहे. नाल्यांमध्ये कचरा जाण्यापासून रोखण्यासाठी महानगरपालिका प्रशासन विविध उपाययोजना राबवित आहे. नाल्यांमध्ये येणाऱ्या कचऱ्यास प्रतिरोध करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने प्रायोगिक तत्वावर काही ठिकाणी जाळी बसविली आहे. तरीही, काही व्‍यक्‍ती तथा गाळेधारक नाल्‍यांमध्‍ये थर्माकॉल, प्लास्टिक पिशव्या, फर्निचर, रबर, रॅपर्स असा विविध प्रकारच्या तरंगत्या वस्तू (फ्लोटिंग मटेरीअल) टाकत आहेत. त्‍यामुळे सांडपाणी वहन, निचरा होण्यास अडथळे निर्माण होत आहे. (BMC)

(हेही वाचा – Air India च्या अहमदाबाद-लंडन विमानात पुन्हा मोठा बिघाड, ऐनवेळी विमान रद्द!  )

धारावी येथील टी जंक्‍शनकडे जाणाऱ्या नाल्‍याची महानगरपालिकेने नुकतीच स्‍वच्‍छता केली आहे. गाळ काढण्‍याबरोबरच तरंगत्‍या वस्‍तुदेखील काढण्‍यात आल्‍या. तरीही, सोमवारी, १६ जून २०२५ रोजी जी उत्‍तर विभागातील घनकचरा व्‍यवस्‍थापन विभागाच्‍या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता अज्ञातांनी या नाल्‍यात थर्माकॉल, रबर, रॅपर्स, पार्सल बॉक्‍स आदी औद्योगिक अशा विविध वस्‍तू टाकल्‍याचे निदर्शनास आले. त्‍याची गंभीर दखल घेत आणि वरिष्‍ठांच्‍या सूचनेनूसार, शाहुनगर पोलिस ठाण्‍यात तक्रार नोंदवण्‍यात आली आहे. नालेसफाईच्या कामात अडथळा निर्माण करणारी ही कृती गंभीर असून यामुळे आपत्ती व्यवस्थापनास अडचणी निर्माण होत आहे. यासंदर्भात भारतीय न्‍याय संहिता २०२३ कलम ३२६ (क) अन्‍वये दोषींवर गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांमार्फत संबंधित व्‍यक्‍ती/आस्‍थापनाचा शोध घेतला जात आहे. विशेष म्हणजे या सर्व ठिकाणी अनाधिकृत गोदाम, गॅरेज आणि भंगार दुकाने आदींचे गाळे असून या विरोधात कारवाई करण्याचे सोडून केवळ एफआयआर नोंदवून एकाप्रकारे या बांधकामांना संरक्षण देण्याचे काम महापालिकेकडून केले जात आहे. त्यामुळे येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. (BMC)

नागरिकांनी प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, थर्माकोल अशा विविध वस्तू व तत्‍सम कचरा नाल्यांमध्ये किंवा गटारांमध्ये टाकू नये, जेणेकरुन कचरा अडकून नाले तुंबणार नाहीत आणि पाण्याचा जलद निचरा होत राहील. नाल्याच्या नजीकच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनी, नागरिकांनी नाल्यात थेट कोणताही कचरा न टाकता मुंबई महानगरपालिकेला सहकार्य करावे. कचरा केवळ कचरा कुंडीतच टाकावा. सर्वांनी महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. (BMC)

(हेही वाचा – Israel Iran Conflict : इराणला अण्वस्त्रे बनवण्याची परवानगी नाही; ट्रम्प यांनीही दिला कठोर इशारा)

कुठून येतो असा कचरा? 
  • भंगार दुकान
  • कचरा संकलन करणारे कचरा वेचक
  • टीव्ही आणि फ्रिज दुरुस्त करणारे
  • वाहनांचे सीट कव्हर बनवणारे
  • जुने मेट्रासिस बनवणारे

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.