Air India च्या अहमदाबाद-लंडन विमानात पुन्हा मोठा बिघाड, ऐनवेळी विमान रद्द!  

162


Air India : गुजरात राज्यातील अहमदाबादमध्ये मागील हाफ्त्यात एअर इंडियाच्या विमानाचे मोठा अपघात झाला होता. याच घटनेला पाच दिवस पुर्ण झाले आहेत. अशातच मंगळवार 17 जूनला पुन्हा एकदा अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, एअर इंडियाचे विमान AI-159 रद्द (Air India AI-159 cancelled) केल्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड संताप आहे. (Air India)

(हेही वाचा – दिल्लीला जाणाऱ्या IndiGo विमानाचे नागपुरात Emergency landing; नेमकं काय प्रकरण?)

मिळालेल्या माहितीनुसार, विमान अपघातानंतर एअर इंडियाचे विमान AI 159 लंडनला रवाना होणार होते. मात्र, त्यापूर्वीच तपासणीत तांत्रिक बिघाड आढळल्याने विमान रद्द करण्यात आले. हे विमान लंडनला परत कधी जाणार, याबद्दल काहीही माहिती मिळू शकली नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार, टेकऑफ करण्यासाठी काही वेळ शिल्लक असतानाच हे विमान रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हे विमान अहमदाबाद विमानतळावरून म मंगळवारी दुपारी 1:10 वाजता टेकऑफ करणार होते. सकाळपासूनच फ्लाईटला उशीर होत होता. आता तर थेट तांत्रिक बिघाडाचे कारण सांगून विमान रद्द करण्यात आले. प्रवाश्यांना याबद्दलची माहिती एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी दिली. पाच दिवसांपूर्वीच अहमदाबाहून लंडनला निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात झाला. हा अपघात किती जास्त भंयकर होता, हे व्हायरल व्हिडीओवरून स्पष्ट होत आहे.

(हेही वाचा – Israel Iran Conflict : इराणला अण्वस्त्रे बनवण्याची परवानगी नाही; ट्रम्प यांनीही दिला कठोर इशारा)

या अपघातात फक्त रमेश विश्वास कुमार (Ramesh Vishwas Kumar) हे जिवंत सापडले आहेत. त्यांनी अपघातावेळी विमानातून उडी घेतल्याचेही सांगितले. रमेश यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की, माझ्या डोळ्यासमोर अनेकांचे जीव गेले. थोडी जागा शिल्लक असल्याने मी अपघातग्रस्त विमानातून बाहेर येऊ शकलो. विमानातील 241 लोकांचा मृत्यू झाला. यासोबतच हॉस्टेलवर विमान कोसळल्याने काही मेडिकलच्या विद्यार्थ्यांचाही जीव गेला. त्यानंतर अपघाताच्या पाचव्याच दिवशी एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान रद्द करण्यात आले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.