मंगळवारी कोचीहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाला विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी (Flight bomb threat) मिळाली होती. दरम्यान नागपूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. (Emergency landing)
इंडिगोचे विमान क्रमांक 6E 2706 हे केरळमधील कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी 9.20 वाजता दिल्लीसाठी निघाले आणि हवेतच बॉम्बची धमकी मिळाल्याने विमान नागपूर विमानतळावर वळवण्यात आले. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. चौकशी सुरू आहे. विमानाच्या शोधात काहीही सापडले नाही विमानात 157 प्रवासी होते आणि आतापर्यंत काहीही संशयास्पद आढळले नाही. उपलब्ध माहितीनुसार, विमान लवकरच उड्डाण करेल अशी अपेक्षा आहे. सुरुवातीच्या अहवालांनुसार, विमानात बॉम्ब ठेवल्याची माहिती विमान अधिकाऱ्यांना मिळाली होती. सुरक्षा नियमांनुसार, विमानाचे उड्डाण वळवण्यात आले आणि ते नागपूरमध्ये सुरक्षितपणे उतरवण्यात आले.
बॉम्ब शोधक आणि निकामी करणारे पथक (BDDS) तातडीने पोहोचले आणि त्यांनी विमानाची कसून तपासणी सुरू केली. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आणि विमान तपासणीसाठी एका वेगळ्या ठिकाणी हलवण्यात आले. विमानतळावरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) आणि स्थानिक पोलिस या धोक्याच्या मूळचा सक्रियपणे तपास करत आहेत. मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी गुजरातहून लंडनसाठी रवाना झालेले एअर इंडियाचे विमान अहमदाबादमधील मेघानी नगर परिसरात कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेला काही तास उलटले तोच, एअर इंडियाने 13 जून रोजी सकाळी मुंबईहू लंडनला जाणाऱ्या विमानाला अर्ध्यातूनच माघारी बोलावून घेतले. त्यानंतर उलटसुलट चर्चांना उधाण आले. याबाबत एअर इंडियाकडून स्पष्टीकरण देण्यात आले.
एअर इंडियाने (Air India) एक्स हँडलवरून दिलेल्या माहितीनुसार, “इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काही विमाने वळवण्यात आली. तर, काही विमानांना पुन्हा परतण्याचे आदेश देण्यात आले. याबाबत एअर इंडियाने यादी जाहीर केली. या यादीत मुंबई लंडन फ्लाइट एआय 129 विमानाचाही समावेश आहे. हे विमान मुंबई विमानतळावर सुरक्षितपणे उतरले आहे.”