Israel Iran Conflict : इस्रायलला स्वसंरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार; G7 देशांनी केले समर्थन

Israel Iran Conflict : 'इराणला कधीही अण्वस्त्रे बनवण्याची परवानगी दिली जाणार नाही,' असे जी-७ नेत्यांचे म्हणणे आहे.

71

इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. (Israel Iran Conflict) अशातच कॅनडा येथे होत असलेल्या जी-७ शिखर परिषदेतून (G-7 Summit) इराणला इशारा देण्यात आला आहे. जी-७ च्या सर्वोच्च नेत्यांनी संयुक्त निवेदन जारी करत तेहरानला (Tehran) इशारा दिला आहे. ‘इराणला कधीही अण्वस्त्रे बनवण्याची परवानगी दिली जाणार नाही,’ असे जी-७ नेत्यांचे म्हणणे आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पदेखील या शिखर परिषदेसाठी उपस्थित आहेत.

(हेही वाचा – Iran Israel Conflict : इराणमध्ये अडकलेल्या भारतियांसाठी सरकारने स्थापन केला नियंत्रण कक्ष, हेल्पलाइन क्रमांकही केला जारी)

जी-7 शिखर परिषदेतील नेत्यांनी प्रसारित केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे, “इस्रायलला आपले संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्याच्या सुरक्षिततेसाठी आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. नागरिकांचे संरक्षणही महत्वाचे आहे. इराण हा प्रादेशिक अस्थिरता आणि दहशतवादाचे एक मुख्य कारण आहे. इराण कधीही अण्वस्त्रे बाळगू शकत नाही, यावर आम्ही ठाम आहोत.”

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यासह सर्वच जी-७ नेत्यांनी मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावावर प्रतिक्रिया दिली आहे. “जर इराणचा प्रश्न सुटला, तर या प्रदेशातील तणाव कमी होऊ शकतो. यात गाझा युद्धविरामाचाही समावेश आहे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदीही G-7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी कनॅनिस्किस येथे पोहोचले आहेत. गेल्या दशकात मोदींचा हा पहिलाच कॅनडा (Canada) दौरा आहे. १६ जून आणि १७ जून असे या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी सलग सहाव्यांदा जी-७ शिखर परिषदेत सहभागी होत आहेत. (Israel Iran Conflict)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.