Israel Iran War: इस्रायलने इराणी टीव्ही स्टुडिओवर केला हल्ला; टीव्ही अँकरने काढला स्टुडिओमधून पळ, व्हायरल VIDEO आला समोर

201
इराणमधील तेहरान येथील सरकारी टेलिव्हिजन स्टेशनवर इस्रायलने लाईव्ह प्रक्षेपण सुरू असताना स्फोट घडवून आणला आहे. त्यामुळे चॅनेलला लाईव्ह प्रक्षेपण (Live broadcast) थांबवावे लागले. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लाईव्ह प्रक्षेपण सुरू असताना स्फोटाचा आवाज ऐकू येतो. तसेच यामध्ये चॅनेलचा स्टुडिओ धुराने भरलेला दिसत आहे. त्यामुळे टीव्ही अँकरसह (TV anchor) इतर कर्मचारी ताबडतोब कॅमेरा सोडून तिथून पळून गेले. तथापि, यावेळी तेथे उपस्थित असलेले लोक अल्लाह-हू-अकबरच्या घोषणा देत असल्याचे ऐकू येत आहे. (Israel Iran War)

(हेही वाचा – Ashadhi Wari : सामाजिक न्याय विभागांतर्गत प्रती दिंडी २० हजारांचे अनुदान जाहीर)

इस्रायलने स्टुडिओ रिकामा करण्याचा इशारा दिला होता
इस्रायलने हल्ला करण्यापूर्वी इराणची राजधानी तेहरानचा तो भाग रिकामा करण्याचा इशारा दिला होता. हा टीव्ही स्टुडिओ देखील त्याच भागात आहे. सोमवारी इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केला होता, ज्यामुळे बरेच नुकसान झाले होते. इराणच्या हल्ल्यामुळे इस्रायलमध्ये धोक्याचे सायरन वाजू लागले. हल्ल्यात आठ नागरिक मारले गेले आणि अनेक जखमी झाले, असे इमर्जन्सी सेवांनी सांगितले.
इस्रायल अजून हल्ले करणार
इस्रायल इराणवर आणखी हल्ले करणार आहे. इस्रायलच्या सैन्याने तेहरानमधील काही भागांतील लोकांना घरं सोडण्यास सांगितले आहे. इराणने सोमवारी सकाळी इस्रायलवर मिसाइलने हल्ला केला. त्यात पाच लोक मारले गेले. इस्रायलने दावा केला आहे की, त्यांनी तेहरानवर हवेत नियंत्रण मिळवले आहे. ते कोणत्याही धोक्याशिवाय इराणच्या राजधानीवरून उड्डाण करू शकतात.
(हेही वाचा – राज्यातील धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे उपसभापती Neelam Gorhe यांचे निर्देश)
इस्रायलने १२० ईरानी मिसाइल नष्ट केले 
युद्धाच्या चौथ्या दिवशी, इस्रायली सैन्याने सांगितले की, त्यांनी इराणमधील १२० पेक्षा जास्त जमिनीवरून मारा करणारी मिसाइल लाँचर्स नष्ट केली. हे इराणच्या एकूण मिसाइल लाँचरच्या एक तृतीयांश आहे. लढाऊ विमानांनी तेहरानमधील कुद्स फोर्सच्या १० कमांड सेंटर्सवर हल्ला केला. कुद्स फोर्स ही इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्डची खास शाखा आहे. ही संघटना इराणबाहेर लष्करी आणि गुप्तचर ऑपरेशन्स करते. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये युद्धाची परिस्थिती आहे. इस्रायलने इराणच्या वैज्ञानिका ठार केले. इराणने इस्रायलची एअर डिफेंस सिस्टीम भेदली होती.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.