Mumbai City : मुंबईत आता ‘आयकॉनिक इमारती’ बांधणाऱ्या विकासकांना प्रोत्साहन; मिळणार अशाप्रकारे लाभ

166
Mumbai City : मुंबईत आता 'आयकॉनिक इमारती' बांधणाऱ्या विकासकांना प्रोत्साहन; मिळणार अशाप्रकारे लाभ
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मुंबई शहराचा कायापालट होतानाच इतर देशातील शहरांप्रमाणे आकर्षक इमारती बांधण्यासाठी आता विकासक तथा वास्तूविशारदांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. मुंबईत आयकॉनिक इमारती बनवण्याबाबत विकास नियंत्रण नियमावली २०३४मधील नियमावलीत सुधारणा करण्यात येत आहे. त्यानुसार विकास नियंत्रण नियमावली ३७(१) मध्ये फेरबदल करण्यात येत असून इतर शहरांप्रमाणे आयकॉनिक इमारती बांधकाम केल्यास अतिरिक्त एफएसआयचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे भविष्यात मुंबईत इतर शहरांमध्ये उंच आणि आकर्षक इमारतींचे बांधकाम केले जाणार आहे. (Mumbai City)

मुंबईतील इमारतीच्या किंवा अभिन्यासास विकासाची परवानगी देण्यासाठी, विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४ च्या नियमांमधील तरतुदी लागू आहेत आणि त्यानुसार, नियोजन प्राधिकरणाद्वारे परवानग्या दिल्या जातात. तरीही विविध निर्बंधांच्या मर्यादा तथा बंधनामुळे, जसे ‘आयकॉनिक इमारती’ बाबत, अशा प्रकारच्या इमारतींसाठी वास्तुविशारदांकडून इमारती तथा परिसराचे नियोजन आणि डिझाइन तयार करण्यात काही अडथळे येतात. अशा प्रकल्पाचे विकासक तथा वास्तुविशारद ‘आयकॉनिक इमारती’ बनू शकणाऱ्या इमारतींना सौंदर्यात्मक उंचीच्या वास्तुशिल्पीय वैशिष्ट्यांचा प्रस्ताव प्रचलित विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४ च्या तरतुदींनुसार देऊ शकत नाही. त्यामुळे विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४ मध्ये त्या उंचीच्या तथा वास्तुशिल्पीय वैशिष्ट्यांची चटईक्षेत्रामध्ये अर्थात एफएसआय गणना करणे आवश्यक आहे. (Mumbai City)

(हेही वाचा – BMC School : शाळेचा पहिला दिवस; मुलांशी संवाद साधताना आयुक्तांना आठवले आपले शिक्षक आणि मुख्याध्यापक)

महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आयकॉनिक इमारती किंवा जागा म्हणजे अशा इमारती किंवा जागा ज्यांच्या काही विशिष्ट किंवा वैशिष्ट्यांमुळे आकार, सौंदर्यशास्त्र, देखावा, संकल्पना, थीम, शहरी रचना, स्थापत्य रचना, संरचनात्मक रचना, इत्यादी असू शकतात. अशा प्रकारच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांसह डिझाइन केलेल्या इमारती किंवा जागा प्रचलित नियमांच्या तरतुदी विचारात घेऊन नियोजन करणे कंठीण असू शकते. मुंबईचे ऐतिहासिक, आर्थिक, पर्यटन आणि वारसा महत्त्व लक्षात घेता, शहराचे सौंदर्य वाढविण्यासाठी अशा ‘आयकॉनिक इमारती किंवा परिसर’ च्या निर्मितीला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. (Mumbai City)

वास्तूविशारद यांच्या कौशल्याने आणि क्षमतेचा वापर विशिष्ट्य वैशिष्ट्यासह नाविन्यपूर्ण संकल्पना इमारतीचा आराखडा तयार केलयस अशा डिझाईन आणि निर्मितीसाठी प्रोत्साहित करणे आणि प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याने विद्यमान डिसी रुल्स ३७(१)मध्ये फेरबदल करण्यात येत असून याबाबत लवकरच नागरिकांकडून हरकत व सूचना मागवल्या जाणार आहेत. त्यामुळे लवकरच सर्व प्रकारच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव आता नगरविकास खात्याला अंतिम मंजुरीसाठी पाठवले जातील आणि त्यानंतर या डिसी रुल्सनुसार आयकॉनिक इमारतींबाबतचे प्रस्ताव आयुक्तांच्य स्तरावर निर्णय घेत मंजूरी दिली जाईल,अशी माहिती मिळत आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार विकासक तथा वास्तविशारदाने सादर केलेले डिझाईन हे शहराच्या दृष्टीकोनातून आकर्षक आणि नाविन्यपूर्ण असेल तरच याला मंजुरी दिली जाऊ शकते आणि आयुक्तांनी मंजुरी दिल्यानंतरच या आयकॉनिक इमारतींच्या बांधकामांमध्ये अतिरिक्त एफएसआयचा लाभ दिला जाणार आहे. (Mumbai City)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.