Meta AI Video Editing : फेसुबकवर आता एआयच्या मदतीने व्हिडिओही होणार एडिट

Meta AI Video Editing : व्हिडिओ एडिटिंग टूल वेब आणि ॲपमध्ये उपलब्ध झालं आहे. 

52
Meta AI Video Editing : फेसुबकवर आता एआयच्या मदतीने व्हिडिओही होणार एडिट
  • ऋजुता लुकतुके

मेटा कंपनीने एक मोठं पाऊल टाकताना फेसबुक, इन्स्टाग्रामच्या सदस्यांना एआयच्या मदतीने ऑनलाईन व्हिडिओ एडिटिंगची सोय उपलब्ध करून दिली आहे. मेटा एआय ॲप आणि मेटा एआय वेबवर ही सोय उपलब्ध आहे. तसंच एडिट्स ॲपमध्येही तुम्हाला एडिटिंग करता येईल. कोणत्याही व्यावसायिक एडिटिंगच्या प्रशिक्षणाशिवाय तुमचे छोटे आणि घरगुती व्हिडिओ आता तुम्ही एडिट करू शकाल. त्यासाठी मेटा एआयचे काही प्रॉम्प्ट्स तुम्हाला मदत करतील. (Meta AI Video Editing)

(हेही वाचा – India Tour of England : भारताची कप्तानी जाहीर झाल्यावर शुभमन गिलने आधी काय केलं?)

सध्या १० सेकंदांपर्यंतचा व्हीडिओ मजकूर तुम्ही यात एडिट करू शकाल. एडिटिंगमध्ये पेहराव, पार्श्वभूमी, ठिकाण आणि अगदी व्हिज्युअल स्टाईलही तुम्ही बदलू शकाल. तुमचा व्हिडिओ तुम्ही आधीच्याच पद्धतीने मेटा एआयवर अपलोड करायचा आहे. तिथे तुम्हाला एडिटिंगचे प्रॉम्पट विचारले जातील आणि तुमच्या पसंतीचे पर्याय निवडून तुम्ही व्हिडिओ एडिट करू शकाल. व्हिडिओचा फोकस, स्पष्टता अशा गोष्टीही तुम्ही इथे बदलू शकता. (Meta AI Video Editing)

(हेही वाचा – Census 2027 : भारतातील पहिली डिजिटल जनगणना ! अ‍ॅपचा वापर, ३५ लाख जनगणना अधिकारी… वाचा सविस्तर माहिती एका क्लिकवर)

इतकंच नाही तर एआयच्या मदतीने तुम्ही फोटोंमध्ये नवीन कॅरेक्टरही आणू शकता. खासकरून गेमिंगमधील एखादं कॅरेक्टर तुम्ही इथे आणू शकता. एआय एडिटकडे मेटा कंपनी व्यावसायिक वापरासाठीही बघत आहे. नेहमीचे सदस्य आपले घरगुती व्हिडिओ तर एडिट करतीलच. शिवाय इन्फ्लुएन्सर समाजाला यातून जास्त मदत मिळेल, असं मेटाला वाटतं. सध्या एआय एडिट टूल अमेरिका आणि इतर १२ देशांमध्ये उपलब्ध आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये त्याची व्याप्ती वाढवण्यात येईल. हे टूल मोफत उपलब्ध आहे आणि प्रायोजिक तत्त्वावर ते आधी वापरलं जाईल. या वर्षाच्या शेवटी एडिटिंग टूल आणखी व्यावसायिक स्वरुपात लाँच करण्याचा कंपनीचा विचार आहे. तेव्हा व्यावसायिक फिचरही यात आणली जातील. (Meta AI Video Editing)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.