दौंडवरुन पुण्याला निघालेल्या डेमू ट्रेनमध्ये अचानक आग लागल्याने प्रवाशांमध्ये घबराट उडाली. यात एक व्यक्ती टॉयलेटमध्ये अडकून राहिल्याने त्याला दरवाजा तोडून सुखरुप बाहेर काढण्यात आले. (Fire in Daund-Pune Train)
मिळालेल्या माहितीनुसार, दौंड -पुणे ही डेमू ट्रेन मध्ये ०७:०५ वाजता दौंड वरून सुटून पुण्याला येत असताना ट्रेनच्या टॉयलेट मध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. त्या टॉयलेटमध्ये एक व्यक्ती अडकून राहिला होता. डेमू यवत स्थानकात (Yavat Railway Station) येतात इंजिनपासून तिसऱ्या बोगीत आग लागली. या आगीमुळे प्रचंड धूर पसरल्याने प्रवाशांमध्य भितीचे वातावरण पसरले.
(हेही वाचा – Census 2027 : भारतातील पहिली डिजिटल जनगणना ! अॅपचा वापर, ३५ लाख जनगणना अधिकारी… वाचा सविस्तर माहिती एका क्लिकवर)
आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर ट्रेन पुणे स्थानकात (Pune Junction Railway Station) आणण्यात आली. या गाडीने कामधंद्यासाठी दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. दररोज सकाळी या ट्रेनला खूप गर्दी असते. प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.
प्रवाशांची पळापळ आग आणि धुरामुळे प्रवासी घाबरले, आणि जीव वाचवण्यासाठी किंकाळ्या आणि आरडाओरड करत इकडे-तिकडे धावू लागले. काही प्रवाशांनी तातडीने ट्रेनच्या आपत्कालीन साखळी खेचून ट्रेन थांबवली. दरम्यान, आग लागलेल्या टॉयलेटमध्ये एक व्यक्ती अडकली होती. टॉयलेटचा दरवाजा लॉक झाल्याने तो उघडत नव्हता. या व्यक्तीने जोरजोरात आरडाओरड केल्याने इतर प्रवाशांच्या लक्षात आले.
धुरामुळे श्वास घेण्यास त्रास होत असतानाही काही धाडसी प्रवाशांनी टॉयलेटचा दरवाजा तोडून त्या व्यक्तीला सुखरूप बाहेर काढले, ज्यामुळे त्याचा जीव वाचला. ट्रेन थांबवताच रेल्वे कर्मचारी आणि स्थानिकांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले, आणि काही वेळातच अग्निशमन दल घटनास्थळावर दाखल झाले. (Fire in Daund-Pune Train)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community