Scare At Lucknow Airport : आता लखनऊ विमानतळ ! सौदी एअरलाईन्सच्या विमानातून ठिणग्या आणि धूर

Scare At Lucknow Airport : रन-वेवर यशस्वी लँडिंगनंतर विमान टॅक्सी-वेकडे जात असताना अचानक त्याच्या डाव्या बाजूच्या चाकातून धूर आणि ठिणग्या निघू लागल्या.

90

उत्तरप्रदेशच्या (Uttar Pradesh) लखनऊ येथे मोठी विमान दुर्घटना टळली. सौदी एअरलाईन्सचे विमान लँड झाल्यानंतर विमानाच्या चाकातून ठिणग्या आणि धूर निघू लागला. त्यानंतर वैमानिकाने प्रसंगावधान राखत एटीसीला माहिती दिली आणि संभाव्य अपघात टळला. या विमानातील जेद्दाहहून येणारे 282 हज यात्रेकरू सुरक्षित आहेत. (Scare At Lucknow Airport)

(हेही वाचा – Matheran च्या शार्लेट तलावात नवी मुंबईचे तीन तरुण बुडाले !)

यासंदर्भातील माहितीनुसार, सौदी अरेबियन एअरलाइन्सचे (Saudi Arabian Airlines) विमान (एसव्ही-3852) शनिवारी रात्री जेद्दा विमानतळावरून (Jeddah Airport) लखनऊसाठी निघाले होते. या विमानात २८२ हज यात्रेकरू प्रवास करत होते. हे विमान रविवारी सकाळी 6.30 वाजता अमौसी विमानतळावर उतरले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रन-वेवर यशस्वी लँडिंगनंतर विमान टॅक्सी-वेकडे जात असताना अचानक त्याच्या डाव्या बाजूच्या चाकातून धूर आणि ठिणग्या निघू लागल्या. ही बाब लक्षात येताच पायलटने तात्काळ एअर ट्रॅफिक कंट्रोलला (Air traffic control, एटीसी) याची सूचना दिली.

घटनेची माहिती मिळताच विमानतळावरील अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी तातडीने फोम आणि पाण्याचा मारा करून केवळ 20 मिनिटांत परिस्थिती नियंत्रणात आणली. या सर्व प्रकारामुळे विमानात बसलेल्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर विमानाला पुश बॅक करून टॅक्सी-वेवर आणण्यात आले आणि सर्व प्रवाशांना सुखरूप खाली उतरवण्यात आले. त्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

प्रवाशांना सुखरूप उतरवल्यानंतर अभियंत्यांच्या पथकाने विमानाच्या चाकातील बिघाड दुरुस्त करण्याचे काम सुरू केले. मात्र, रविवारी सायंकाळपर्यंत हा बिघाड दुरुस्त होऊ शकला नव्हता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाच्या लँडिंग दरम्यानच डाव्या बाजूच्या चाकात बिघाड झाला होता. हायड्रॉलिक सिस्टीममध्ये लिकेज झाल्यामुळे ही समस्या उद्भवल्याचे सांगण्यात येत आहे. याच कारणामुळे चाकातून धूर आणि ठिणग्या निघू लागल्या होत्या.

विमानतळाच्या प्रवक्त्याने सांगितले की, विमानात काही तांत्रिक बिघाड झाला होता आणि अभियंत्यांचे पथक तो दुरुस्त करत आहे. विमानातील बिघाड दुरुस्त होताच ते जेद्दासाठी रवाना केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Scare At Lucknow Airport)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.