Mumbai Girgaon Best Bus Accident : गिरगाव मेट्रो स्थानकाजवळ खचला रस्ता; बस अडकली पाच फूट खड्ड्यात

107

मुंबईतील गिरगाव परिसरात मेट्रो स्टेशनजवळ (Mumbai Metro 3) बेस्ट बसचा अपघात झाला आहे. गिरगाव येथील मेट्रो स्टेशनजवळ भर गर्दीच्या वेळेत रस्ता खचल्याने बेस्ट बसचा अपघात झाला. बस ५ फूट खोल खड्डयात अडकली आहे. या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही; पण बेस्ट बसने (Best bus) प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झाले. या बेस्ट बसचा खड्ड्यात पडल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. (Mumbai Girgaon Best Bus Accident )

(हेही वाचा – Maharashtra Rain : रस्ते जलमय … हवामान विभागाकडून २३ जिल्ह्यांना अलर्ट जारी ; कुठे काय परिस्थिती?)

सोमवार, सकाळी नऊ ते साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. गिरगाव चौपाटीजवळील (Girgaon Chowpatty) मेट्रोच्या कामासाठी रस्त्याखाली खोदकाम सुरू असताना बेस्ट बस त्या मार्गावरून जात होती. मेट्रोच्या कामामुळे रस्त्याचा काही भाग खचला होता. याच खड्ड्यात बसचा मागील भाग अडकला आणि हा अपघात झाला. बस भर वर्दळीच्या वेळेत अडकून पडल्याने मागची वाहतूकही खोळंबली आणि वाहतूक कोंडी निर्माण झाली.

सिमेंटचे रस्ते जे बांधले गेले त्या रस्त्याला बेस द्यायचं असतो. पण टेक्निकली गोष्टी घाईघाईत पूर्ण केल्या आहेत. रस्त्यांचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. कंत्राटदाराला घाईघाईत काम करायला लावले आणि निकृष्ट दर्जाचे काम झाले. मे महिन्यात पाऊस पडला आणि तरीही कंत्राटदाराला पटापट काम करा असे सांगण्यात आलेले आहे, असे मनसे नेते यशंवत किल्लेदार यांनी सांगितले. (Mumbai Girgaon Best Bus Accident)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.