Maharashtra Rain : रस्ते जलमय … हवामान विभागाकडून २३ जिल्ह्यांना अलर्ट जारी ; कुठे काय परिस्थिती?

Maharashtra Rain : रस्ते जलमय ... हवामान विभागाकडून २३ जिल्ह्यांना अलर्ट जारी ; कुठे काय परिस्थिती?

104
Maharashtra Rain : रस्ते जलमय ... हवामान विभागाकडून २३ जिल्ह्यांना अलर्ट जारी ; कुठे काय परिस्थिती?
Maharashtra Rain : रस्ते जलमय ... हवामान विभागाकडून २३ जिल्ह्यांना अलर्ट जारी ; कुठे काय परिस्थिती?

मान्सून (Maharashtra Rain) पुढील 24 ते 48 तासांत मध्यप्रदेशात प्रवेश करू शकतो. त्यापूर्वी, पूर्व-मान्सून सक्रिय असल्याने, संपूर्ण राज्यात वादळ आणि पावसाचा कालावधी सुरू आहे. आज 62 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याचा अंदाज आहे की, 18 जून रोजी गोरखपूर मार्गे मान्सून राज्यात प्रवेश करेल. (Maharashtra Rain)

हेही वाचा-Mumbai Crime : डान्सबार मध्ये गुन्हे शाखेचा छापा ; पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलंबित

मुंबईतील पावसाने पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने सुरु आहे. ईस्टर्न हायवे, वेस्टर्न हायवेसह सर्व वाहतूक संथ गतीने सुरू आहेत. मुसळधार पाऊसामुळे, जलमय रस्त्यांमुळे आणि लोकल उशिरा धावत असल्याने कर्मचाऱ्यांना कामावर पोहोचण्यास उशीर होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Rain)

हेही वाचा- Pune Indrayani River Bridge Collapse : कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर ; जखमींवर मोफत उपचार…

हवामान विभागाने मुंबई शहर व उपनगरांमध्ये रिमझिम सरी बरसण्याचा अंदाज वर्तवला आहे. मुंबईला यलो अर्ट दिला असून कोकण किनारपट्टीतील जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. रत्नागिरीला रेड अलर्ट, पालघर, ठाणे, रायगड व सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. किनारपट्टीच्या भागात अतिवृष्टी देखील होऊ शकते असं हवामान विभागने म्हटलं आहे. (Maharashtra Rain)

हेही वाचा- Crime : अमेरिकाचा व्हिसा नाकारल्याने बॉम्बची धमकी, तरुणाचा शोध सुरू

उत्तर महाराष्ट्रात नाशिक, आहिल्यानगर व जळगाव या तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट जाहीर झाला आहे. तर धुळे व नंदूरबारमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसेल असं हवामान विभागाने म्हटलं आहे. या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना कोणत्याही प्रकारचा अलर्ट दिलेला नसला तर या भागात पावसाचा जोर दिसून येईल असं हवामान विभागाने म्हटलं आहे. पुणे, सातारा व कोल्हापूरमधील घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो. (Maharashtra Rain)

हेही वाचा- Maval Bridge Collapse प्रकरणी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांचा मुख्यमंत्र्यांना फोन

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, जालना, नांदेड, धाराशिव, हिंगोली व परभणी या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. तर, विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. यामध्ये नागपूर, चंद्रपूर, अमरावती, वर्धा, गोंदिया, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, वाशिम व बुलढाण्याचा समावेश आहे. (Maharashtra Rain)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.