Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित

66

उत्तराखंडमधील केदारनाथ धामजवळ हेलिकॉप्टर कोसळून दुर्घटना घडली. या अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्व लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे, यामध्ये एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या घटनास्थळी आहेत. चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Kedarnath Helicopter Crash)

(हेही वाचा – Accident News : कोल्हार-घोटी राज्यमार्गावर ट्रॅव्हल्स अन् ट्रकचा भीषण अपघात ; तिघांचा मृत्यू)

गौरीकुंडला जाणारे हेलिकॉप्टर कोसळले, याचा परिणाम आता चारधाम यात्रेच्या हेलिकॉप्टर सेवेवरही झाला आहे. अपघातानंतर लगेचच हेलिकॉप्टर सेवा स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले. पुढील आदेश येईपर्यंत हा आदेश पाळला जाईल. अपघाताचे बळी ठरलेले प्रवासी उत्तराखंड, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरातमधील आहेत.

समिती स्थापन करण्याचे आदेश

‘राज्यात हेली सेवांच्या संचालनासाठी एक कठोर एसओपी तयार करावी, यामध्ये उड्डाण करण्यापूर्वी हेलिकॉप्टरची तांत्रिक स्थिती पूर्णपणे तपासली पाहिजे.’ याशिवाय हवामानाची अचूक माहिती असणे देखील बंधनकारक करावे. मुख्यमंत्री धामी यांनी मुख्य सचिवांना तांत्रिक तज्ञांची एक समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. ही समिती हेली ऑपरेशन्सच्या सर्व तांत्रिक आणि सुरक्षिततेच्या पैलूंचा आढावा घेतल्यानंतर एसओपी तयार करेल, उत्तराखंडमधील वाढत्या हेलिकॉप्टर अपघातांच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी कडक आदेश दिले आहेत.

पायलटसह सात जणांचा मृत्यू

उत्तराखंडमधील केदारनाथ धाममध्ये गौरीकुंड परिसरातील त्रिजुगीनारायण नारायणजवळ अपघातग्रस्त हेलिकॉप्टर आर्यन कंपनीचे होते आणि ते केदारनाथ धामहून फाटा येथे जात होते. सकाळी ०५:१७ वाजता, आर्यन कंपनीचे हेलिकॉप्टरने केदारनाथ हेलिपॅडवरून गुप्तकाशीसाठी ६ भाविक आणि पायलटसह उड्डाण केले. खराब हवामानामुळे, हेलिकॉप्टर लँडिंग करताना कोसळले. हेलिकॉप्टरमध्ये राजवीर (पायलट), विक्रम रावत, विनोद, तृष्टी सिंह, राजकुमार, श्रद्धा आणि राशी (वय १० वर्षे) असे प्रवासी होते. या अपघातात हेलिकॉप्टरमधील सर्व ७ जणांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ आणि एनडीआरएफच्या टीम घटनास्थळी पोहोचल्या आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्रातील भाविकांचाही समावेश आहे. (Kedarnath Helicopter Crash)

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.