इस्रायल-इराण धुमसत असताना Kim Jong Un यांचा अधिकाऱ्यांना मोठा आदेश !

इस्रायल-इराण धुमसत असताना Kim Jong Un यांचा अधिकाऱ्यांना मोठा आदेश !

139
इस्रायल-इराण धुमसत असताना Kim Jong Un यांचा अधिकाऱ्यांना मोठा आदेश !
इस्रायल-इराण धुमसत असताना Kim Jong Un यांचा अधिकाऱ्यांना मोठा आदेश !

इराण आणि इस्रायलमधील युद्ध सतत तीव्र होत आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) यांनी आपल्या अधिकाऱ्यांना काही आदेश दिले आहेत. इराण-इस्रायल यांच्यातील युद्धानंतर आता उत्तर कोरियात हालचाली वाढल्या आहेत. किम जोंग (Kim Jong Un) यांनी लगेच आपल्या देशातील शस्त्रनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांचा दौरा केला आहे. सोबतच त्यांनी या कारखान्यांनी दारु-गोळ्याचे उत्पादन वाढवावे, असा मोठा आदेश दिला आहे. (Kim Jong Un)

सध्याचे आधुनिक युद्ध लक्षात घेऊन अधिक शक्तिशाली दारु-गोळा तयार करायला हवा. तसेच उत्पादन क्षमता वाढवा असा आदेश त्यांनी दिला आहे. किम जोंग उन यांनी शुक्रवारी मेटल प्रेसिंग अँड असेब्ली युनिट्सला भेट दिली. येथे गेल्यानंतर त्यांनी 2025 सालातील पहिल्या सहामाईत किती दारु-गोळ्याची निर्मिती झाली, याची माहिती घेतली. तसेच तिथल्या अधिकाऱ्यांनाही फैलावर घेतलं. (Kim Jong Un)

हेही वाचा-Pandharpur Ashadhi Wari : ११०९ दिड्यांना प्रत्येकी २० हजारांचे अनुदान; राज्य शासनाकडून परिपत्रक जारी

सध्या जग युद्धाच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे ज्या देशाकडे सर्वाधिक शक्तिशाली शस्त्र, तोच देश भविष्यकालीन युद्धात तग धरू शकणार आहे. हीच बाब लक्षात घेता किम जोंग उन यांनी आपल्या प्रशासनाला थेट शस्त्रास्त्र उत्पादनाची गती वाढवण्याचा आदेश दिला आहे. उत्तर कोरियातील शासकीय माध्यम संस्था केसीएनएने तेथील शासकीय अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. (Kim Jong Un)

हेही वाचा- ST Corporation : एसटी महामंडळातंर्गत ५ प्रादेशिक विभागांची निर्मिती; परिवहनमंत्र्यांचे निर्देश

गेल्या काही दिवसांत किम जोंग उन हे आपली सेना कशी मजबूत होईल, यावर जोर देताना दिसत आहेत. सध्याच्या घडीला उत्तर कोरिया आणि रशिया यांच्यातील मेत्रीचे संबंध वृद्धींगत होताना दिसत आहेत. मे महिन्यात आलेल्या संयुक्त राष्ट्राच्या रिपोर्टनुसार उत्तर कोरियाने रशियाला आतापर्यंत 20 हाजारांपेक्षा जास्त कंटेनर शस्त्रं पाठवले आहेत. (Kim Jong Un)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.