Iran Israel Conflict : इराणचे संरक्षण मंत्रालय, अणु प्रकल्पावर इस्रायलचा जोरदार हल्ला ; 138 इराणींचा मृत्यू

Iran Israel Conflict : इराणचे संरक्षण मंत्रालय, अणु प्रकल्पावर इस्रायलचा जोरदार हल्ला ; 138 इराणींचा मृत्यू

64
Iran Israel Conflict : इराणचे संरक्षण मंत्रालय, अणु प्रकल्पावर इस्रायलचा जोरदार हल्ला ; 138 इराणींचा मृत्यू
Iran Israel Conflict : इराणचे संरक्षण मंत्रालय, अणु प्रकल्पावर इस्रायलचा जोरदार हल्ला ; 138 इराणींचा मृत्यू

इस्त्रायलने (Iran Israel Conflict) इराणच्या आण्विक कार्यक्रम आणि लष्करी तळांवर केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत 138 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लष्कर प्रमुख, आयआरजीसी प्रमुखांसह दोन शास्त्रज्ञांचा सुद्धा समावेश आहे. यानंतर इराणने सुद्धा मिसाईल ड्रोनने टार्गेट करत तेल अविवमध्ये हल्ला केला आहे. त्यामुळे दोन्ही देशातील तणाव वाढला आहे. इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये इराण लष्कर प्रमुख मोहम्मद बघेरी आणि इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चे प्रमुख हुसेन सलामी यांच्यासह अनेक वरिष्ठ लष्करी आणि सुरक्षा अधिकारी ठार झाले आहेत. (Iran Israel Conflict)

इस्रायली संरक्षण दलाने रविवारी (15 जून) एक्सवर पोस्ट करत सांगितले की, त्यांनी तेहरानमधील इराणच्या संरक्षण मंत्रालयाच्या मुख्यालयाला लक्ष्य केले आहे. इस्रायली सैन्याने असेही म्हटले आहे की, त्यांनी तेहरानभोवती इराणच्या अणुकार्यक्रमाशी संबंधित ठिकाणांनाही लक्ष्य केले आहे. (Iran Israel Conflict)

इराणच्या हल्ल्यात इस्रायलमध्ये 3 मृत्युमुखी, 21 जण जखमी
इराणच्या हल्ल्यात तीन नागरिकांचे प्राण गेल्याचं इस्रायली माध्यमांनी म्हटलं आहे. याआधी दोन जणांचे प्राण गेल्याचं सांगण्यात येत होतं. इस्रायलच्या इमर्जन्सी सर्व्हिसच्या प्रमुख मेगन डेव्हिड अ‍ॅडोम (एमडीए) यांनी सांगितलं की, इराणी हवाई हल्ल्यात जखमी झालेल्या 21 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.(Iran Israel Conflict)

भारताने केल्या सूचना जारी
इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर, तेहरानमधील भारतीय दूतावासाने नागरिकांसाठी एक सूचना जारी केली आहे. दूतावासाने त्यांच्या ‘एक्स’ अकाउंटवर लिहिलं आहे की, “इराणमधील सध्याची परिस्थिती पाहता, सर्व भारतीय नागरिकांना आणि इराणमधील भारतीय वंशाच्या व्यक्तींना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. सर्व नागरिकांना अनावश्यक कृती टाळण्याचा आणि दूतावासाच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर लक्ष ठेवण्याचा आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.”(Iran Israel Conflict)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.