Shriram Finance Share Price : श्रीराम फायनान्स कंपनीचा शेअर या आठवड्यात ५ टक्के का पडला?

Shriram Finance Share Price : खरंतर श्रीराम फायनान्स शेअरमधील उलाढाल वाढली आहे. 

52
Shriram Finance Share Price : श्रीराम फायनान्स कंपनीचा शेअर या आठवड्यात ५ टक्के का पडला?
  • ऋजुता लुकतुके

श्रीराम फायनान्स ही भारतातील आघाडीची रिटेल बँकेतर वित्तीय संस्था आहे. बँकेच्या तगड्या तिमाही निकालांनंतर या शेअरने शेअर बाजारातही मोठी तेजी पकडली होती. मागच्या ६ महिन्यात हा शेअर तब्बल ६ टक्क्यांनी वर चढला आहे. तर गेल्या महिनाभरातही शेअरने १६ अंशांची किंवा २.४७ टक्क्यांची तेजी अनुभली आहे. पण, या तेजीला ब्रेक लागला तो या आठवड्यात जेव्हा शेअर गेल्या पाच दिवसांत ४ टक्क्यांनी खाली आला. शुक्रवारी बाजार बंद होताना तो ६६८ वर बंद झाला. शुक्रवारी राष्ट्रीय आणि मुंबई अशा दोन्ही बाजारांत या शेअरच्या खरेदी – विक्रीवरच बंदी घालण्यात आली. गुंतवणूकदारांचं नुकसान टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं. असं आठवडाभर या शेअरमध्ये काय झालं ते पाहूया, (Shriram Finance Share Price)

(हेही वाचा – Inox Wind Share Price : हरित ऊर्जा क्षेत्रातील ही कंपनी गुंतवणूकदारांचं लक्ष का घेतेय वेधून)

New Project 2025 06 14T215345.239

गुरुवारी श्रीराम फायनान्सचा शेअर ६६७ रुपयांपर्यंत खाली आला होता. ही घट १.२३ टक्क्यांची होती. यात विशेष म्हणजे या शेअरमध्ये झालेली उलाढाल खूप मोठी होती. म्हणजेच शेअरमध्ये गुंतवणूकदारांचा रस वाढलेला दिसला. ही वेळ काळजी करण्यासारखी असते. म्हणजे गुंतवणूकदार नेमके कोण आहेत हे ओळखण्याची असते. ही ओळख पटली तरंच आपण शेअरमध्ये गुंतवणुकीवर विचार करू शकतो. म्हणूनच शेअर बाजारांनी खरेदी – विक्रीवर बंदी घातली होती. (Shriram Finance Share Price)

एरवी नवीन आर्थिक वर्षात शेअरने निफ्टी आणि सेन्सेक्स निर्देशांकांमध्ये प्रवेश मिळवला आहे. त्यातून गुंतवणूकदारांचा आणि शेअर बाजारांचाही या शेअरवर असलेला विश्वासच दिसून येतो. त्याच्या जोरावरच शेअर मागच्या वर्षभरात तब्बल १४ टक्क्यांनी वर चढला आहे. पण, अलीकडे या शेअरमध्ये खरेदी बरोबरच विक्रीचा जोरही दिसून आला आहे. त्यामुळे संशोधन संस्थांनीही शेअरचं रेटिंग कमी करून न्यूट्रल केलं आहे. (Shriram Finance Share Price)

(डिस्क्लेमर – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची आहे. गुंतवणूकदारांनी आपल्या वैयक्तिक जबाबदारीवर गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरमधील खरेदी – विक्रीचा कुठलाही सल्ला देत नाही.)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.