Inox Wind Share Price : हरित ऊर्जा क्षेत्रातील ही कंपनी गुंतवणूकदारांचं लक्ष का घेतेय वेधून

Inox Wind Share Price : आयनॉक्स विंड ही पवन ऊर्जा क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. 

82
Inox Wind Share Price : हरित ऊर्जा क्षेत्रातील ही कंपनी गुंतवणूकदारांचं लक्ष का घेतेय वेधून
  • ऋजुता लुकतुके

आयनॉक्स जीएफएल हा उद्योग समुह भारतातील रसायनं आणि अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक केलेला समुह आहे. कंपनीच्या आयनॉक्स विंड एनर्जी लिमिटेड आणि आयनॉक्स विंड लिमिटेड अशा दोन ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या आहेत. १० जून रोजी केंद्रीय कंपनी कायदे लवादाने या दोन कंपन्यांच्या विलिनीकरणाला अखेर परवानगी दिली आहे. त्यामुळे आयनॉक्स समुहाला आपल्या ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांचं कारभार सुटसुटीत आणि एकछत्री करायला मदत होणार आहे. शिवाय या क्षेत्रातील स्पर्धेला तोंड देण्यासाठीही याची मदत होणार आहे.

ही बातमी शेअर बाजारात पसरल्यानंतर दोन्ही कंपन्यांच्या शेअरवर गुंतवणूकदारांचं लक्ष होतं. आठवड्याच्या सुरुवातीला दोन्ही कंपन्यांमध्ये २ टक्क्यांची तेजी दिसून आली. पण, त्यानंतर जागतिक बाजारातील अनिश्चितता, इस्त्रायल – इराण युद्धाचे ढग आणि त्यातही अणूऊर्जा प्रकल्पांवरील हल्ल्याच्या भीतीनंतर दोन्ही कंपन्यांचे शेअर शुक्रवारी घसरले आहेत. खासकरून आयनॉक्स विंड लिमिटेड या लहान कंपनीचे शेअर ३ टक्क्यांच्या घसरणीसह १०७ रुपयांवर बंद झाले आहेत.

(हेही वाचा – Iran-Israel War : तणाव कमी झाला नाही तर कच्च्या तेलाचा भडका उडण्याची शक्यता?, तज्ज्ञ म्हणाले…)

New Project 2025 06 14T214529.502

पण आठवडाभर या विलिनीकरणाची चर्चा मात्र होत राहिली. या विलिनीकरणामुळे निर्माण होणाऱ्या नवीन कंपनीची आर्थिक स्थिती मजबूत व्हायला मदत होणार आहे. कंपनीचा ताळेबंद सुधारेल. आणि दोन्ही कंपन्यांवर मिळून असलेलं २,०५० कोटी रुपयांचं दायित्व एकदम कमी होऊन जाईल. त्यामुळे विलिनीकरणाच्या बातमीकडे शेअर बाजार सकारात्मक दृष्टीकोनातून पाहत आहे.

फक्त इतकंच नाही तर कंपनीची एकूण संरचना आता अधिक सुसुत्र होईल. यापूर्वी आयनॉक्स विंड लिमिटेड ही उपकंपनी होती. तिची बहुतांश मालकी आयनॉक्स विंड एनर्जी लिमिटेड या कंपनीकडे होती. त्यामुळे कामकाजात संभ्रम होता. तो आता दूर होईल. आयनॉक्स विंड एनर्जी लिमिटेडच्या १० शेअरमागे भागधारकांना आयनॉक्स विंड लिमिटेड कंपनीचे ६३२ शेअर मिळतील. कंपनीचं मूल्यांकनही यामुळे सुधारणार आहे. ही एकूण प्रक्रिया दीड महिना चालेल. त्यानंतर नवीन कंपनीवर तांत्रिक किंवा मूलभूत अभ्यास करता येईल.

(डिस्क्लेमर – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची आहे. गुंतवणूकदारांनी आपल्या वैयक्तिक जबाबदारीवर गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरमधील खरेदी – विक्रीचा कुठलाही सल्ला देत नाही.)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.