इराणने हल्ले थांबवले नाही तर तेहरान जळून खाक होईल; Israel चा इशारा

इराणने अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि सशस्त्र ड्रोनने इस्रायलवर हल्ला केला आहे. काल रात्री जेरुसलेम आणि तेल अवीवमध्ये सायरनचा आवाज ऐकू आला. या हल्ल्यांमध्ये अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे आणि लोकांना जीव वाचवण्यासाठी बंकरमध्ये आश्रय घ्यावा लागला.

96

तेहरानवरील हल्ल्यांनंतर, इराण आता इस्रायलला (Israel) लक्ष्य करत आहे. त्यांच्याकडून शेकडो क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले आहेत, ज्यामध्ये इस्रायलचेही नुकसान झाले आहे. इस्रायलचे (Israel) संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी शनिवारी, १४ जून २०२५ रोजी इशारा दिला की, जर इराणने जेरुसलेमवरील क्षेपणास्त्र हल्ले थांबवले नाही तर तेहरान जळून खाक होईल, असा इशारा दिला.

इस्रायलच्या (Israel) हल्ल्यात ३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर डझनभर लोक जखमी झाले आहेत. इस्रायली (Israel) लष्कराच्या प्रमुखांसोबत झालेल्या  बैठकीनंतर, इस्रायली संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, इस्रायली नागरिकांवर हल्ला करण्याची इराणला मोठी किंमत मोजावी लागेल. जर इराणी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी इस्रायलवरील क्षेपणास्त्र हल्ले थांबवले नाहीत तर तेहरान जळेल. इस्रायलमधील (Israel) लोकांना बंकरमध्ये आश्रय घ्यावा लागला.

(हेही वाचा Veer Savarkar : सावरकरबंधूंचा अवमान अजून किती सहन करणार?; सात्यकी सावरकरांनी उपस्थित केला सवाल)

इराणने अनेक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि सशस्त्र ड्रोनने इस्रायलवर हल्ला केला आहे. काल रात्री जेरुसलेम आणि तेल अवीवमध्ये सायरनचा आवाज ऐकू आला. या हल्ल्यांमध्ये अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे आणि लोकांना जीव वाचवण्यासाठी बंकरमध्ये आश्रय घ्यावा लागला. इस्रायलने  (Israel)  दावा केला आहे की, त्यांच्या दिशेने येणारी अनेक क्षेपणास्त्रे रोखण्यात आली आहेत, तर अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचे वृत्त आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी शुक्रवारी सांगितले की, इस्रायलचे उद्दिष्ट इराणी धोक्याचा नाश करणे आहे. त्यांनी इराणच्या लोकांना राजवटीविरुद्ध बंड करण्यास सांगितले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.