WTC Final : कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला मिळाला नवा विजेता; आफ्रिकन संघाची ऑस्ट्रेलियावर ५ गडी राखून मात

WTC Final : चौथ्या डावात आफ्रिकन संघाने नेटाने फलंदाजी केली. 

80
WTC Final : कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला मिळाला नवा विजेता; आफ्रिकन संघाची ऑस्ट्रेलियावर ५ गडी राखून मात
  • ऋजुता लुकतुके

दक्षिण आफ्रिकेचा चोकर हा शिक्का अधिकृतपणे पुसून निघाला आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत त्यांनी विजेत्याच्य्या थाटात खेळ करत ऑस्ट्रेलियाला ५ गडी राखून हरवलं. २७ वर्षांनंतर आफ्रिकन संघाने पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धा जिंकली आहे. यापूर्वी १९९८ मध्ये त्यांनी पहिली चँपियन्स स्पर्धा जिंकली होती. लॉर्ड्सवर झालेल्या या कसोटीत आफ्रिकन संघाची सुरुवात अडथळती होती. पहिल्या डावांत १३८ धावांत बाद झाल्यामुळे त्यांनी ऑस्ट्रेलियाला ७५ धावांची आघाडी बहाल केली होती. पण, मैदानावर ऊन पडल्यावर सामन्याचा नूर पालटला. आणि दुसऱ्या डावात आफ्रिकन फलंदाजांनी कात टाकली. (WTC Final)

सुरुवातीला २८२ धावांचं लक्ष्य चौथ्या डावासाठी मोठं वाटत होतं. पण, एडन मार्करमने शतक झळकावत आफ्रिकेसाठी विजय सुनिश्चित केला. कर्णधार बमुआने ६६ धावा करत त्याला सुरेख साथ दिली. या दोघांनी सामना ऑस्ट्रेलियापासून दूर नेला. (WTC Final)

(हेही वाचा – ISSF Shooting Gold : सुरुची सिंगला सुवर्ण; मनू भाकर पात्रता फेरीतच बाद)

तिसऱ्या दिवशीच या दोघांनी दीडशतकी भागीदारी करून आफ्रिकेला विजयाच्या जवळ आणलं होतं. पहिल्या डावातील चुका दोघांनीही टाळल्या. नेटाने टाकून राहण्याच्या इराद्याने फलंदाजी केली. चौथा दिवस ही औपचारिकता होती. हनुमान ६६ धावांवर बाद झाल्यानंतरही बेडिंघॅने मार्करमला साथ देत विजयाच्या मार्गावरून ढळू दिलं नाही. अखेर भोजनापूर्वीच्या शेवटच्या षटकात आफ्रिकेनं विजयाची औपचारिकता पूर्ण केली. ऑस्ट्रेलियाकडून स्टार्कने ३ गडी बाद केले. बाकी एकही गोलंदाज बळी निळवताना दिसला नाही. १३२ धावा करणारा एडन मार्करम सामनावीर ठरला. (WTC Final)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.