Aadhar Card निःशुल्क अपडेट करण्यास ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

127
Aadhar Card निःशुल्क अपडेट करण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) आधार कार्ड (Aadhar Card) मोफत अपडेट करण्याची अंतिम मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत 14 जून 2025 पर्यंत होती. आता ती 14 जून 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. यूआयडीएआयने आपल्या अधिकृत ट्विटर (एक्स) हॅन्डलवर याबाबत माहिती दिली आहे.

(हेही वाचा – Minister Sanjay Rathod यांच्या ‘लाडक्या’ अधिकाऱ्याच्या भूमिकेवरून वादाला फोडणी; नेमकं काय घडलं?)

या निर्णयामुळे ज्या नागरिकांनी अद्याप आपले आधार कार्ड (Aadhar Card) अपडेट केलेले नाही, त्यांना आणखी एक वर्षाचा कालावधी मिळाला आहे. विशेषतः ज्या व्यक्तींचे आधार कार्ड 10 वर्षे किंवा त्याहून अधिक जुने आहे, त्यांनी एकदाही ते अपडेट केलेले नाही, त्यांच्यासाठी हे अपडेट करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, अशा व्यक्तींनी ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा सादर करून आपले आधार तपशील अद्ययावत करणे अनिवार्य आहे. असे न केल्यास त्यांचे आधार कार्ड रद्द होण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा – ISSF Shooting Gold : सुरुची सिंगला सुवर्ण; मनू भाकर पात्रता फेरीतच बाद)

आधार कार्ड (Aadhar Card) अपडेट करण्यासाठी नागरिकांना दोन प्रकारच्या कागदपत्रांची आवश्यकता असेल – एक ओळखीचा पुरावा (उदा. पॅन कार्ड) आणि दुसरा पत्त्याचा पुरावा (उदा. मतदार ओळखपत्र). साधारणपणे आधार केंद्रांवर या प्रक्रियेसाठी 50 रुपये शुल्क आकारले जाते. तथापि, यूआयडीएआयने दिलेल्या माहितीनुसार, 14 जून 2026 पर्यंत ही सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध असेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.