Heavy Rainfall Forecast : आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क

65
Heavy Rainfall Forecast : आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क
  • प्रतिनिधी

राज्यात येत्या काही दिवसांत अतिवृष्टी आणि संभाव्य पूर परिस्थितीबाबत उपाय योजना म्हणून एनडीआरएफ, एसडीआरएफ पथकांना आपत्कालीन परिस्थितीत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कारण राज्यात मागील २४ तासामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ७०.३ मिमी पाऊस झाला असून त्या खालोखाल रत्नागिरी ४५ मिमी, मुंबई शहर २५.४, पुणे २३.८ आणि रायगड जिल्ह्यात २० मिमी पावसाची नोंद झाली असल्याची माहिती शनिवारी राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली. (Heavy Rainfall Forecast)

(हेही वाचा – India Tour of England : इंग्लंड दौऱ्यातील सराव सामन्यात कुणाची कामगिरी वरचढ?)

राज्यात शुक्रवार ते शनिवारी पर्यंत कोसळलेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) त्यात ठाणे ३.४, रायगड २०, रत्नागिरी ४५, सिंधुदुर्ग ७०.८, पालघर ०.२, नाशिक १०.५, धुळे २.२, नंदुरबार ४.६, जळगाव ४.८, अहिल्यानगर ५.५, पुणे २३.८, सोलापूर ५.९, सातारा ८.८, सांगली २.६, कोल्हापूर ७, छत्रपती संभाजीनगर १६.७, जालना ७.८, बीड ७.६, लातूर २, धाराशिव ९.५, नांदेड ०.६, परभणी ०.७, हिंगोली ०.८, बुलढाणा २.७, अकोला ३, वाशिम १.८, अमरावती ०.६, यवतमाळ ०.८, नागपूर २.४, भंडारा ३.४, गोंदिया १.१, चंद्रपूर ०.४ आणि गडचिरोली ०.२. अशीही माहिती आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली. (Heavy Rainfall Forecast)

(हेही वाचा – Minister Sanjay Rathod यांच्या ‘लाडक्या’ अधिकाऱ्याच्या भूमिकेवरून वादाला फोडणी; नेमकं काय घडलं?)

आषाढवारी निमित्ताने इंद्रायणी नदी पात्रात मोठ्याप्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे (एसडीआरएफ) एक पथक देहु येथ तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) एक पथक आळंदी येथे तैनात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही यावेळी सांगण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमधील अडीवरे गावात अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन पुलावरुन पाणी वाहत होते. स्थानिक प्रशासनाकडून वाहतुक बंद करण्यात आली होती. याबाबत स्थानिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून ठाणे जिल्ह्यातील तुर्भे एमआयडीसी येथे जनरेटरच्या धुरामुळे ग्रस्त झालेल्या २८ लोकांपैकी २६ व्यक्तींना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून दोन व्यक्ती रुग्णालयात उपचार घेत असल्याचेही राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले. (Heavy Rainfall Forecast)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.