परदेशी शिक्षणाची संधी आता भारतातच; पाच नामांकित आंतरराष्ट्रीय विद्यापीठांसोबत करार, मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची घोषणा

93
परदेशी शिक्षणाची संधी आता भारतातच; पाच नामांकित आंतरराष्ट्रीय विद्यापीठांसोबत करार, मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची घोषणा
  • प्रतिनिधी

परदेशात उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न आता भारतीय विद्यार्थ्यांसाठी भारतातच पूर्ण होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते मुंबईत ‘मुंबई रायझिंग : क्रिएटिंग अ‍ॅन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी’ कार्यक्रमात पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना आशयपत्र (LOI) प्रदान करण्यात आले.

(हेही वाचा – Minister Sanjay Rathod यांच्या ‘लाडक्या’ अधिकाऱ्याच्या भूमिकेवरून वादाला फोडणी; नेमकं काय घडलं?)

या ऐतिहासिक कार्यक्रमाला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, तसेच यूके, अमेरिका, इटली आणि ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांचे पदाधिकारी उपस्थित होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात अ‍ॅबरडीन (स्कॉटलंड), यॉर्क (यूके), वेस्टर्न ऑस्ट्रेलिया (ऑस्ट्रेलिया), इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (अमेरिका) आणि इस्तितुतो यूरोपीओ दी डिझाईन (इटली) या पाच जागतिक विद्यापीठांचे पूर्ण कॅम्पस उभारले जाणार आहेत.

(हेही वाचा – India Tour of England : इंग्लंड दौऱ्यातील सराव सामन्यात कुणाची कामगिरी वरचढ?)

मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले की, हे उपक्रम राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार राबवले जात असून, भविष्यात आणखी विद्यापीठांचे स्वागत करण्यास महाराष्ट्र तयार आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले की, परदेशी विद्यापीठांच्या माध्यमातून भारतीय विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण कमी खर्चात मिळेल, आणि विकसित भारताचे स्वप्न साकार होईल. या पुढाकारामुळे मुंबई केवळ आर्थिकच नव्हे, तर शैक्षणिक राजधानी म्हणूनही ओळखली जाईल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.