-
ऋजुता लुकतुके
ओलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनी भारतात सार्वजनिक वाहतुकीसाठीच्या इलेक्ट्रिक बसेस बनवते. अलीकडेच कंपनीने त्यांना मिळालेली एक मोठी ऑर्डर जाहीर केली होती. त्यानुसार, महाराष्ट्र सरकार या कंपनीकडून एक मोठं कंत्राट मिळालं होतं. महाराष्ट्र परिवहन विभागाकडे असलेल्या ५,००० पेक्षा जास्त इलेक्ट्रिक बसेसची देखभाल, दुरुस्ती आणि त्या चालवण्याचं कामही ओलेक्ट्रा कंपनी करणार होती. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र सरकारकडून पत्रही मिळवलं होतं. (Olectra Share Price)
पण, अचानक हे कंत्राट प्रत्यक्षात येऊ शकणार नसल्याचं समोर आलं आणि तिथून दोन आठवड्यांपूर्वी या शेअरमध्ये घसरण सुरू झाली. पहिल्या आठवड्यात ही घसरण तब्बल ८ टक्क्यांची होती. अजूनही ती थांबलेली दिसत नाही. ओलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीची शेअर गेल्या पाच दिवसांत साडेतीन टक्क्यांनी पडला आहे. तर शुक्रवारी शेअरमधील घसरण एका टक्क्याची म्हणजेच ११.९० अंशांची होती. (Olectra Share Price)
(हेही वाचा – Mumbai Railway Accident : धक्कादायक ! घाटकोपरमध्ये रेल्वे प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू !)
यात वाईट म्हणजे या कंपनीने निर्धारित वेळेत बस महाराष्ट्र सरकारला पुरवल्या नसल्याचा ठपका ठेवत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी ही ऑर्डर रद्द केली. त्यांनी लिहिलेल्या ट्विटमध्ये कंपनीच्या नावाचा उल्लेख नाही. पण, या घडामोडीशी संबंधित असलेल्या व्यक्तींकडून कंपनीचं नाव उघड झालंच. तिथून शेअरमधील ही घसरण सुरू झाली. कारण, ही ऑर्डर तब्बल १,००० बसची होती आणि कंपनी २२ मे पर्यंत या बसेस सरकारला पुरवणार होती. पण, हा करार बिनसल्यावर शेअरवर त्याचा परिणाम दिसून येत आहे. (Olectra Share Price)
कंपनीचे मार्च तिमाही निकाल मात्र आश्वासक आहेत. कंपनीने आर्थिक वर्षातील शेवटच्या तिमाहीत ३८ टक्के वाढ नोंदवली आहे. निव्वळ नफा २०.८५ कोटींवर पोहोचला आहे. तर कंपनीचा महसूलही ४४९ कोटींवर आहे. कंपनीने भागधारकांना एका शेअरमागे ४० पैशांची लाभांशही जाहीर केला आहे. (Olectra Share Price)
(डिस्क्लेमर – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची असते. गुंतवणूकदारांनी स्वत:च्या जोखमीवर गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरच्या खरेदी अथवा विक्रीचा कुठलाही सल्ला देत नाही.)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community