Rohit Sharma : मुंबईच्या पावसात रोहित शर्माची गाडी अडकते तेव्हा…

Rohit Sharma : लोकांनी रोहितला ओळखून त्याच्या भोवती गर्दी केली.

169
Rohit Sharma : मुंबईच्या पावसात रोहित शर्माची गाडी अडकते तेव्हा…
  • ऋजुता लुकतुके

रोहित शर्मा (Rohit Sharma) मुंबई टी-२० लीगसाठी वानखेडे स्टेडिअमवर आला तेव्हा पावसामुळे त्याला स्टेडिअमवर पोहोचणंही मुश्कील झालं होतं. इतक्यात लोकांनी त्याला ओळखल्यामुळे वेगळीच समस्या निर्माण झाली. स्टेडिअमच्या रस्त्यावर पाऊस असूनही लोकांनी त्याच्या कारभोवती गर्दी केली. मुंबईत रोहित शर्माची लोकप्रियता पुन्हा एकदा दिसून आली. मुंबई साऊथ सेंट्रल मराठा रॉयल्स आणि सोबो यांच्या दरम्यान स्पर्धेचा अंतिम सामना झाला.

रोहित (Rohit Sharma) वानखेडे स्टेडिअमजवळ आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि लोकांनी पावसातच त्याला सेल्फीचा आग्रह केला. काहींनी रोहितची काळी एसयुव्हीही ओळखली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रोहितने नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे आणि तो फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळणार आहे. गेल्यावर्षी जून महिन्यात टी-२० प्रकारात भारताने विश्वचषक जिंकल्यावर त्याने या प्रकारातून निवृत्ती घेतली होती.

(हेही वाचा – ऑपरेशन चक्र-५ अंतर्गत CBI चे १० ठिकाणी छापे; कल्याणमधून एकाला अटक)

मुंबई टी-२० लीगमध्ये साऊथ सेंट्रल मराठा संघाने सोबोचा पराभव करत ही पहिली वहिली लीग जिंकली आहे. रोहितने व्हीआयपी बॉक्समध्ये बसून या सामन्याचा आनंद लुटला. मुंबईचा उन्हाळी हंगाम आता संपला आहे. रोहितचं (Rohit Sharma) लक्ष इंग्लंड दौऱ्यानंतर होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या मालिकेकडे लागलं आहे. भारतीय संघ १७ ऑगस्टपासून बांगलादेशविरुद्ध ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा एकदा भारतीय संघातून खेळताना दिसतील.

त्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार असून तिथेही संघ एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळणार आहे. रोहित (Rohit Sharma) आणि विराट यांचा हा शेवटचा ऑस्ट्रेलिया दौरा असेल. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दोघांचा सन्मान करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. एकदिवसीय सामन्यात रोहितच भारताचं नेतृत्व करणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.