Heavy Rain Forecast : मागील काही दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस(Heavy Rain Forecast) लवकर राज्यभरात स्थिरावण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दरम्यान, महाराष्ट्रा मान्सून(Heavy Rain Forecast) पुन्हा एकदा सक्रिय झाला असून पुढील काही दिवसांत पावसा(Heavy Rain Forecast)चा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून कडाक्याच्या उन्हापासून नागरिकांची सुटका होणार असून राज्यात सर्वत्र पावसाचे चित्र पाहायला मिळणार आहे.(Heavy Rain Forecast)
(हेही वाचा Shani Shingnapur : देवस्थानातील १६७ कर्मचाऱ्यांची हकालपट्टी, यात ११४ मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश; कारण नेमकं काय? )
दरम्यान, हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, मुंबई कोकणसह मध्य व पश्चिम महाराष्ट्रात अतिमुसळधार ते मुसळधार पावसा(Heavy Rain Forecast)चा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच, पुढील दिवसांत मान्सूनला पोषक वातावरण, एकंदरीत हवामान कसे असेल याबद्दलचे अंदाज वर्तविण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, अनेक वर्षांनंतर वेळेआधीच आलेल्या पावसाने मागील काही दिवसांपासून दडी मारली होती.
१३ जूनपासून राज्यातील काही भागात पावसा(Heavy Rain Forecast)चा जोर वाढण्याची शक्यता आहे, असे मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राने स्पष्ट केले. कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला असून हवामान विभागाने जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. तसेच, १३ जून रोजी मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, पश्चिम घाट, सांगली, कोल्हापूर या भागातही मुसळधार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर वाऱ्याचा वेगही प्रतितास ५० ते ६० किती इतका असेल.(Heavy Rain Forecast)
Join Our WhatsApp Community