मुंबईकरांनो सावधान! मध्य रेल्वेवर रविवारी Mega Block; जाणून घ्या काय आहे वेळापत्रक

110
मुंबईकरांनो सावधान! मध्य रेल्वेवर रविवारी Mega Block; जाणून घ्या काय आहे वेळापत्रक

मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवार दिनांक १५.६.२०२५ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी त्यांच्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक परिचालीत करणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-विद्याविहार अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ पर्यंत सुटणाऱ्या डाउन धीम्या सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील आणि भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे विद्याविहार स्थानकावर डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. (Mega Block)

(हेही वाचा – Akshaya Tritiya Gold Rate : मागच्या पाच वर्षांच्या कालावधीत सोन्याच्या दरात दुप्पट वाढ)

घाटकोपर येथून सकाळी १०.१९ ते दुपारी ३.५२ पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या गाड्या विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवरील थांबतील.

*पनवेल-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत (पोर्ट लाईन वगळून)*

पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ पर्यंत पनवेल/बेलापूर येथे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल येथून ठाणे येथे जाणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा ११.०२ ते दुपारी ३.५३ पर्यंत आणि ठाणे येथून पनवेल येथे जाणाऱ्या डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा १०.०१ ते दुपारी ३.२० पर्यंत रद्द राहतील. (Mega Block)

(हेही वाचा – Shani Shingnapur : देवस्थानातील १६७ कर्मचाऱ्यांची हकालपट्टी, यात ११४ मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश; कारण नेमकं काय?)

ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – वाशी विभागावर विशेष लोकल गाड्या चालवल्या जातील.

ब्लॉक काळात ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर लाईन सेवा उपलब्ध असतील.

ब्लॉक काळात बंदर लाईन सेवा उपलब्ध असतील.

पायाभूत सुविधांच्या देखभाल दुरुस्ती आणि सुरक्षिततेसाठी हे देखभाल मेगा ब्लॉक आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे. (Mega Block)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.