Shani Shingnapur : हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे यश ! शनिशिंगणापूर देवस्थानने हटवले मुसलमान कर्मचारी

76

अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील शनिशिंगणापूर देवस्थानने आपल्या १६७ कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. यात ११४ मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी नुकतेच या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा इशारा दिला होता. (Shani Shingnapur)

राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र शनिशिंगणापूर मंदिरात ११४ मुस्लिम कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांनी गत २१ मे रोजी कथितपणे मंदिराच्या पवित्र चौथऱ्यावर जाऊन ग्रील बसवले होते. तसेच तेथील स्वच्छता व रंगरंगोटीही केली होती. या प्रकारावर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आक्षेप घेताच या कर्मचाऱ्यांच्या हकालपट्टीची मागणी केली होती. तसेच या प्रकरणी १४ जून या दिवशी मंदिराबाहेर मोर्चा काढण्याचाही इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर मंदिराच्या विश्वस्त मंडळाने ट्रस्टमध्ये ११४ मुस्लिम कर्मचारी काम करतात हे मान्य केले, तसेच त्यांच्यावर कारवाईही केली.

(हेही वाचा – Raja Raghuvanshi Murder Case : राजाच्या हत्येत आणखी लोकांचा हात?, रघुवंशी कुटुंबियांनी केली मोठी मागणी)

हे कर्मचारी मुख्यतः शेती विभाग, कचरा व्यवस्थापन आणि शिक्षणाशी संबंधित कामांमध्ये कार्यरत आहेत. ९९ कर्मचारी मागील ५ महिन्यांपासून नोकरीवर अनुपस्थित आहेत. त्यामुळे त्यांचाही पगार बंद करण्यात आला आहे. या सर्वांवर अनियमितता व शिस्तभंगाचा ठपका ठेवण्यात आला आहे.

मंत्री नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी गुरूवारीच हिंदू संघटनांनी मुस्लिम कर्मचाऱ्यांच्या हकालपट्टीची केलेली मागणी योग्यच असल्याचे विधान केले होते. हिंदू संघटनांनी केलेली मागणी योग्यच आहे. हाजी अली आणि अजमेर दर्गात कृत्य कुणी करेल का? असे कृत्य फक्त आपल्या हिंदू धार्मिक स्थळांसोबतच का केले जाते? कोणताही हिंदू व्यक्ती कोणत्याही मुस्लिम धार्मिक स्थळात काम करताना दिसला, तर हे लोक त्याला नक्कीच सोडणार नाहीत. परंतु, ज्या प्रकारे आपल्या हिंदू धार्मिक स्थळांच्या प्रतिष्ठेशी सतत छेडछाड केली जात आहे, ते आपण आता कोणत्याही किंमतीत स्वीकारू शकत नाही, असे ते म्हणाले होते. (Shani Shingnapur)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.