CISM Certificate Cost in India : भारतात सीआयएसएम सर्टिफिकेशनसाठी किती खर्च येतो?

CISM Certificate Cost in India : सायबर सुरक्षेच्या क्षेत्रात हे सर्टिफिकिट महत्त्वाचं आहे.

42
CISM Certificate Cost in India : भारतात सीआयएसएम सर्टिफिकेशनसाठी किती खर्च येतो?
  • ऋजुता लुकतुके

सीआयएसएम म्हणजे सर्टिफाईड इन्फोर्मेशन सेक्युरिटी मॅनेजर. थोडक्यात, सायबर सुरक्षा विषयाची तज्ञ. अर्थात, त्यासाठी एक परीक्षा तुम्हाला उत्तीर्ण करावी लागते आणि ही परीक्षा आयएसएसीए ही संस्था दरवर्षी घेते. ही परीक्षा उत्तीर्ण केल्यावर तुम्हाला आयएसएसीए संस्थेचं सदस्यत्वही तुम्हाला घ्यावं लागतं. हे सदस्यत्व तुमच्याकडे असेल तर तुम्ही तुमच्या कंपनीत नोंदणीकृत सायबर सुरक्षातज्ञ म्हणून काम करू शकता. स्पर्धेची नोंदणी, सदस्य शुल्क आणि अभ्यासाचं साहित्य यांचा खर्च साधारण १.४० लाख रुपये इतकी आहे. पण, एकदा हा खर्च केल्यावर तुम्हाला या विषयातील अद्ययावत ज्ञान मिळतं आणि त्याचा फायदा नोकरीत नक्कीच होतो. (CISM Certificate Cost in India)

(हेही वाचा – Honda Rebel 500 Price in India : होंडाच्या ‘या’ क्रूझर बाईकची किंमत आहे ५ लाख रुपयांच्या वर)

सीआयएसएम परीक्षेचं शुल्क समजून घेऊया :
  • आयएसएसीए सदस्यांकरिता – रु. ४७,१५०
  • आयएसएसीए सदस्यत्वाशिवाय – रु. ६२,२८०

परीक्षेचा अभ्यास तुम्हाला तुमच्या जीवावर घरीही करता येतो. किंवा त्याचं प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आहेत. साधारणपणे प्रशिक्षण सरासरी ३०,००० रुपयांना मिळतं. हा खर्च काही ठिकाणी अगदी लाखभर रुपयांमध्येही जातो. सीआयएसएम सदस्यत्वाचं शुल्क किती आहे बघूया, (CISM Certificate Cost in India)

(हेही वाचा – एका पत्रकारामुळे फुटली युती! अन्यथा BJP-MNS ची जोडी 12 वर्षांपूर्वीच जुळली असती…)

सीआयएसएम सभासदत्व वार्षिक शुल्क – रु १३,९४०

या सगळ्या खर्चाची बेरिज करता एकूण खर्च १.१४ लाख रुपये ते ३.२५ लाख रुपयांपर्यंत जातो. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते. ती ४ तासांची असते आणि यात १५० पर्यायवाचक प्रश्न असतात. २०० ते ८०० रेटिंग गुण तुम्हाला मिळवता येतात आणि उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला ४५० गुण मिळवणं आवश्यक आहे. ही परीक्षा देण्यासाठी काही पात्रता निकष आहेत. सायबर सुरक्षा क्षेत्रात काम करण्याचा ५ वर्षांचा अनुभव, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कामाचा अनुभव किंवा सीआयएसए, सीआयएसएसपी अशा परीक्षा दिलेल्या असतील तर हा अनुभवाचा निकष एका वर्षांनी कमी केला जातो. (CISM Certificate Cost in India)

ही परीक्षा उत्तीर्ण केल्यावर तुम्ही सायबर सुरक्षा नियमन, सुरक्षाविषयक जोखमीचं व्यवस्थापन, सुरक्षाविषयक प्रोग्रामचा विकास व व्यवस्थापन तसंच सायबर सुरक्षेसाठीची व्यवस्था उभी करणं या क्षेत्रात तुम्ही काम करू शकता. सायबर सुरक्षाविषयक ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर तुम्हाला सरासरी २० लाख ते ४० लाख रुपयांपर्यंतचा पगार मिळू शकतो. (CISM Certificate Cost in India)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.