Honda Rebel 500 Price in India : होंडाच्या ‘या’ क्रूझर बाईकची किंमत आहे ५ लाख रुपयांच्या वर

Honda Rebel 500 Price in India : जून २०२५ पासून गाडीची डिलिव्हरी सुरू झाली आहे. 

30
Honda Rebel 500 Price in India : होंडाच्या 'या' क्रूझर बाईकची किंमत आहे ५ लाख रुपयांच्या वर
  • ऋजुता लुकतुके

होंडा कंपनीने गेल्यावर्षी एक मोठा निर्णय घेतला आपली क्रूझर श्रेणीतील प्रिमिअम बाईक होंडा रिबेल ५०० भारतात पुन्हा आणण्याचा. काही महिन्यांपूर्वी गाडीचं बुकिंग सुरू झालं होतं आणि आता गाडीची डिलिव्हरीही सुरू झाली आहे. बाईकचा अत्याधुनिक नवीन लुक आणि डिझाईन सध्या चर्चेत आहे. (Honda Rebel 500 Price in India)

या बाईकमध्ये ४७१ सीसी क्षमतेचं लिक्विड कूल इंजिन आहे आणि यातून ५५.५ पीएस इतकी शक्ती निर्माण होते. यात सहा स्पीड ट्रान्समिशन आहे आणि ही बाईक घसरणार नाही, यासाठी विशेष यंत्रणा बसवण्यात आली आहे. (Honda Rebel 500 Price in India)

(हेही वाचा – Robbery : गुन्हे शाखेकडून ३ कोटींच्या दरोड्याची उकल; तीन जण ताब्यात)

गाडीचा फ्रंट फोर्क टेलिस्कोपिक पद्धतीचा आणि आकाराने ४१ मिमी इतका आहे. तर तर बाईकची फ्रंट डिस्क २९६ मिमी आणि मागची डिस्क २४० मिमी इतकी आहे. मागच्या बाजूला बाईकला शॉक ॲबझॉर्बरही बसवण्यात आले आहेत. या बाईकची सुरुवातीची किंमत ५ लाख १२ हजार रुपये इतकी आहे. (Honda Rebel 500 Price in India)

आणि तिची स्पर्धा रॉयल एनफिल्ड इंटरसेप्टर ६५०, कावासाकी वल्कन आणि हार्ले डेव्हिडसन स्ट्रीट ७५० या बाईकशी असेल. या बाईकचे टायर ट्यूबलेस असतील. तर लीटरमागे २६ किलोमीटर इतकी तिची सरासरी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. (Honda Rebel 500 Price in India)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.