
-
ऋजुता लुकतुके
२५ वर्षीय शुभमन गिल या इंग्लंड दौऱ्यात नवीन भूमिकेसाठी तयार झाला आहे. पहिल्या कसोटीपूर्वी कर्णधारांचं प्रतीकात्मक फोटो-शूट करण्यात येतं. त्या दरम्यान शुभमन गिल आत्मविश्वासपूर्ण दिसत होता. कर्णधार म्हणून आपलं पहिलं फोटो-शूट करताना तो गडबडला नाही. तो अशा संघाचं नेतृत्व करणार आहे, ज्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली नाहीत. अशा संक्रमणावस्थेत असलेल्या संघाला दिशा देण्याचं काम मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली शुभमन गिल करणार आहे. (India Tour of England)
(हेही वाचा – SIM Card शी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल ! मोबाईल सीमकार्ड स्विच करणे होणार सोपे)
बीसीसीआयने या पहिल्या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर टाकले आहेत. लोकहो! तुमचा नवीन कर्णधार, शुभमन गिल!‘ असा मथळा बीसीसीआयने या संदेशाला दिला आहे. आठवड्यापूर्वी भारतीय संघ इंग्लंडमध्ये पोहोचला. तेव्हापासून गिलने सरावात आपल्याला झोकून दिलं आहे. तो खासकरून तेज गोलंदाजीला सामोरं जाण्याचा सराव करताना दिसतोय. तो रोज बुमराहची जवळ जवळ २० षटकं खेळतो. शिवाय सिराज आणि अर्शदीपबरोबरची तो सराव करताना दिसतो. (India Tour of England)
(हेही वाचा – Ahmedabad plane crash : मुलाची भेट राहूनच गेली; सांगोल्यातील दांपत्याची व्यथा)
𝗙𝗼𝗹𝗸𝘀 – 𝘆𝗼𝘂𝗿 𝗧𝗲𝘀𝘁 𝗰𝗮𝗽𝘁𝗮𝗶𝗻, 𝗦𝗵𝘂𝗯𝗺𝗮𝗻 𝗚𝗶𝗹𝗹 #TeamIndia | #ENGvIND | @ShubmanGill pic.twitter.com/dhmc9m6apU
— BCCI (@BCCI) June 11, 2025
बीसीसीआयने आधी जारी केलेल्या एका व्हिडिओत शुभमन गिल आतापर्यंतच्या आपल्या प्रवासावर भाष्य करताना दिसतो. ‘तुम्ही मोठे होत असताना कायम देशासाठी खेळण्याचं स्वप्न पाहता. असंही स्वप्न पाहता की, देशासाठी कसोटी क्रिकेट खेळता यावं. ते स्वप्न पूर्ण झालं हे माझं भाग्य आहे,’ असं शुभमन या व्हिडिओत म्हणताना दिसतो. आता तर तो नेतृत्व करणार आहे. २० तारखेला लीड्स इथं मालिकेतील पहिला कसोटी सामना रंगणार आहे. विराट आणि रोहितच्या निवृत्तीनंतर भारतीय संघासाठी ही पहिली मालिका आहे. शुभमनने इंग्लंड दौऱ्यावर निघतानाच्या पत्रकार परिषदेत रोहित आणि विराटच्या अनुपस्थितीवर भाष्य केलं होतं. ‘दोघांची उणीव भासेल. पण, दडपण नेहमीचं असेल. या दोघांच्या नसण्यामुळे ते वाढणार नाही,’ असं तो म्हणाला होता. (India Tour of England)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community