Robbery : गुन्हे शाखेकडून ३ कोटींच्या दरोड्याची उकल; तीन जण ताब्यात

70
Robbery : गुन्हे शाखेकडून ३ कोटींच्या दरोड्याची उकल; तीन जण ताब्यात
  • प्रतिनिधी

दक्षिण मुंबईतील नागपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरदिवसा झालेल्या ३ कोटींच्या दरोड्याची उकल करण्यात मुंबई गुन्हे शाखेला यश आले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेने तीन जणांना अटक केली आहे. त्यातील एक जण दागिने तयार करणाऱ्या कारखान्यातील कर्मचारी असल्याची माहिती समोर येत आहे. या तिघांचा ताबा नागपाडा पोलीस ठाण्याकडे देण्यात येत आहे. (Robbery)

दक्षिण मुंबईतील नागपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरदिवसा गुरुवारी सकाळी एका दुचाकीस्वाराला शस्त्राचा धाक दाखवत ३ कोटी किंमतीच्या सोन्याची लूट करण्यात आली. लुटण्यात आलेले सोने काळबादेवी येथील पावसकर ब्रदर्स या सराफाचे होते. गुरुवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास दुकानातील दोन कर्मचारी सोने घेऊन एन. एम. जोशी मार्गावर असलेल्या दागिने तयार करणाऱ्या कारखान्यावर दुचाकीवरुन निघाले होते. (Robbery)

(हेही वाचा – Robbery : मुंबईतील नागपाड्यात भरदिवसा दरोडा; ३ कोटींच्या सोन्याची लूट)

नागपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या डायना ब्रिजजवळ पोहोचताच, दुसऱ्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी मागून येऊन त्यांना थांबवले आणि शस्त्राचा धाक दाखवली. सोन्याने भरलेली बॅग हिसकावून घेत कर्मचाऱ्यांच्या दुचाकीची चावी देखील घेतली आणि घटनास्थळावरुन पळ काढला. या दरोड्याचा तपास नागपाडा पोलीस ठाण्यासह मुंबई गुन्हे शाखेचे पथक करीत होते. नागपाडा पोलीस ठाणे आणि मुंबई गुन्हे शाखेने अनेक संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली होती, मात्र या गुन्ह्यात त्याचा सहभाग आढळून आला नाही. (Robbery)

दरम्यान मुंबई गुन्हे शाखेच्या पथकांनी तांत्रिक आणि सीसीटीव्ही फुटेजचा बारकाईने अभ्यास करून कुर्ला पश्चिम न्यू मिल रोड येथून दोघांना तर एकाला वाकोला येथून ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आलेला एक जण दागिन्यांच्या कारखाण्यात कामाला होता, व त्याने इतर दोघानी सोन्याची माहिती इतर दोघांना देऊन दरोड्याची योजना आखली अशी माहिती समोर येत आहे. गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेल्या संशयितांचा ताबा नागपाडा पोलिस ठाणेकडे देण्यात येत आहे. (Robbery)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.