Redevelopment : कामाठीपुरातील विकासाचा मार्ग मोकळा; ८००१ भाडेकरू आणि ८०० जमीन मालकांच्या स्वप्नांना पंख फुटणार

66
Redevelopment : कामाठीपुरातील विकासाचा मार्ग मोकळा; ८००१ भाडेकरू आणि ८०० जमीन मालकांच्या स्वप्नांना पंख फुटणार
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

दक्षिण मुंबईतील प्राचीन व ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या कामाठीपुरा विभागाचा समूह पुनर्विकासासाठी अर्थात क्लस्टर डेव्हपमेंटसाठी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत समूह पुनर्विकास प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्यासाठी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी नियुक्त करण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या आराखड्यासाठी निविदा मागवून मेसर्स माहिमतुरा कन्स्लटेन्ट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा आराखडा ‘कामाठीपुरा पुनर्वसन प्रकल्प – अर्बन व्हिलेज’ या नावाने तयार करण्यात आला आहे. (Redevelopment)

महाराष्ट्र शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्प राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहे. दक्षिण मुंबईतील कामाठीपुरातील गल्ली क्रमांक १ ते १५ या भागातील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त व बिगर उपकरप्राप्त इमारतींचा व भूखंडांचा एकत्रितरित्या समूह पुनर्विकास हा विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४, विनियम ३३ (९) अंतर्गत म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत केला जाणार आहे. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, स्थानिक खासदार अरविंद सावंत, आमदार अमीन पटेल तसेच स्थानिक नागरिकांचा मोठा सहभाग लाभला आहे. या क्षेत्रातील इमारतींचे भूखंड हे अत्यंत छोट्या आकाराचे व अरुंद असल्यामुळे समूह पुनर्विकास हा शास्वत पर्याय ठरतो. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या ८००१ भाडेकरू तथा रहिवाशांना यांना हक्काचे कायम स्वरूपी घर प्राप्त होणार आहे. (Redevelopment)

(हेही वाचा – Mizoram Railway Connectivity : देशातील आणखी एका राज्यात पोहोचली रेल्वे; अभियांत्रिकीचे उत्कृष्ट उदाहरण)

कामाठीपुरा क्षेत्रातील इमारतींचा एकत्रितरित्या समूह पुनर्विकास म्हाडातर्फे विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४, विनियम ३३ (९) अंतर्गत करण्यास १२/०१/२०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता मिळाली. त्यानुसार प्रकल्पाच्या आराखड्यासाठी निविदा मागवून मेसर्स माहिमतुरा कन्स्लटेन्ट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा आराखडा ‘कामाठीपुरा पुनर्वसन प्रकल्प – अर्बन व्हिलेज’ या नावाने तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून रहिवाशांना मोठ्या व सुरक्षित सदनिका, नियोजनबद्ध पायाभूत सुविधांचे नियोजन करण्यात येणार आहे. यामध्ये वाणिज्यिक इमारत, मनोरंजनाचे मैदान सारख्या सुविधांचा देखील समावेश असणार आहे. तसेच या प्रकल्पाच्या माध्यमातून म्हाडास ४४००० चौ. मी. क्षेत्र निविदाधारकांमार्फत उपलब्ध होणार असल्याने मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हाडास मोठ्या प्रमाणात गृहासाठा उपलब्ध होणार आहे. तसेच विकासकास ५६७००० चौ. मी. क्षेत्र उपलब्ध होणार असून अंदाजे ४५०० सदनिका उपलब्ध होणार आहेत. (Redevelopment)

कामाठीपुरा क्षेत्रातील जमिन मालकांना शासन निर्णय ०२.०७.२०२४ अन्वये मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ५० चौ. मी. क्षेत्रफळाच्या भूखंडाकरिता ५०० चौ. फुट क्षेत्रफळाची ०१ सदनिका, ५१ चौ. मी. ते १०० चौ. मी. क्षेत्रफळाच्या भुखंडाकरिता ५०० चौ. फुट क्षेत्रफळाची ०२ सदनिका, १०१ चौ. मी. ते १५० चौ. मी. क्षेत्रफळाच्या भुखंडाकरिता ५०० चौ. फुट क्षेत्रफळाची ०३ सदनिका, १५१ चौ. मी. ते २०० चौ. मी. क्षेत्रफळाच्या भुखंडाकरिता ५०० चौ. फूट क्षेत्रफळाची ०४ सदनिका, २०० चौ. मी. क्षेत्रफळाच्या भूखंडाच्या पुढील प्रत्येक ५० चौ. मी. भुखंड क्षेत्रफळाकरिता ५०० चौ. फुट क्षेत्रफळाची १ अतिरिक्त सदनिका जमीन मालकांना दिली जाणार आहे. (Redevelopment)

(हेही वाचा – Israel attacks Iran : इस्राइलच्या हल्ल्यात इराणचे अनेक वरिष्ठ सैन्य अधिकारी, परमाणु शास्त्रज्ञ ठार)

कामाठीपुरा क्षेत्राची वैशिष्ट्ये : 
  • दक्षिण मुंबईतील कामाठीपुराचे एकूण क्षेत्र : ३४ एकर
  • कामाठीपुरातील एकूण गल्ली : क्रमांक १ ते १५
  • या गल्ल्यांमधील इमारतींची संख्या : सुमारे ९४३ उपकरप्राप्त इमारती
  • उपकर प्राप्त इमारतींमधील भाडेकरु संख्या : सुमारे ६६२५ निवासी, १३७६ अनिवासी असे एकूण ८००१
  • इमारती अथवा जमिनीचे मालक : सुमारे ८०० जमीन मालक
  • या क्षेत्रातील इमारतींचे आयुर्मान : सुमारे १०० वर्षे
  • संपूर्ण भागातील भूखंडाचे निव्वळ क्षेत्रफळ : सुमारे ७३,१४४.८४ चौरस मीटर

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.