
ऋजुता लुकतुके
गतविजेते ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघांदरम्यान आयसीसी कसोटी अजिंक्यपदाची (ICC Test Championship) अंतिम लढत लॉर्ड्सवर सुरू झाली आहे. आणि नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला पहिली फलंदाजी दिल्यावर आफ्रिकन संघाने त्यांना २१२ धावांवर सर्वबाद केलं खरं. पण, त्यांचा हा आनंदही फार काळ टिकला नाही. आणि दिवसअखेर त्यांनीही पहिल्या डावांत ४ बाद ४३ धावा केल्या आहेत. म्हणजे पहिल्या दिवशी तेज गोलंदाजांनी एकूण १४ बळी मिळवले. (WTC Final)
(हेही वाचा – Ganeshutsav 2025 : गणेशोत्सवात गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोफत राजकीय प्रवास !)
लॉर्ड्सची ही खेळपट्टी टणक आणि त्यामुळे चेंडूला उसळी आणि स्विंग देणारी असेल हा अंदाज होताच. त्यामुळे वेळही न दवडता आफ्रिकन कर्णदार बवुमाने (African captain Bavumane) ऑस्ट्रेलियाला पहिली फलंदाजी दिली. सातव्या षटकांत रबाडाने उस्मान ख्वाजा (०) आणि कॅमेरुन ग्रीन (४) यांचा बेमालून काटा काढला. यातील ख्वाजा २० चेंडू खेळूनही शून्यावरच बाद झाला. हा एक नकोसा वाटणारा कसोटी विक्रम आहे. त्यानंतर स्टिव्ह स्मिथ (६६) आणि बो वेबस्टर (७१) यांनी प्रतिकार केला. बाकी ऑसी फलंदाज फक्त हजेरी लावून परतले. ॲलेक्स कॅरीने सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत २३ धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने निदान दोनशेचा टप्पा ओलांडला. आफ्रिकेकडून कासिगो रबाडाने ५१ धावा देत ५ बळी मिळवले. तर यानसेननेही ३ जणांना बाद केलं.
Australian pacers rattle South Africa’s top order in the final session to seize the momentum at Stumps 👊
Follow LIVE ➡️ https://t.co/LgFXTd0jRV pic.twitter.com/wleUcdHzmF
— ICC (@ICC) June 11, 2025
पहिल्या दोन सत्रांवर आफ्रिकन संघाने वर्चस्व गाजवलं. पण, तिसरं आणि शेवटचं सत्र ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी आपल्या नावावर केलं. अगदी पहिल्या षटकापासून मिचेल स्टार्कचे चेंडू स्विंग होत होते. आणि त्याची दिशाही अचूक होती. खासकरुन मार्करमला त्याने बुचकाळ्यात पाडलं. आणि पहिल्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर तो चक्क त्रिफळाचित झाला. स्टार्कच्याच गोलंदाजीवर मिल्डरचा झेल यष्टीरक्षक कॅरीने (Wicketkeeper Carey) एकदा सोडला. पण, त्याला या जीवदानाचा फायदा उचलता आला नाही. आणि तो ६ धावा करून बाद झाला. रायन रिकलटनलाही स्टार्कनेच १६ धावांवर बाद केलं.
(हेही वाचा – Chhattisgarh मध्ये झालेल्या चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा ! स्वयंचलित शस्त्र जप्त)
ऑस्ट्रेलियाच्या सर्वच गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली. कमिन्स आणि हेझलवूड यांनीही प्रत्येकी एक बळी मिळवला आहे. आफ्रिकन संघ आता १६९ धावांनी पिछाडीवर आहे. आणि त्यांची मदार कर्णधार टेंबा बवुमावर (Captain Temba Bavuma) आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community