Tatkal Ticket Booking : रेल्वेचे तात्काळ बुकिंग करण्यापुर्वी ‘हे’ नियम नक्की वाचा ; रेल्वे मंत्र्यांकडून घोषणा

Tatkal Ticket Booking : रेल्वेचे तात्काळ बुकिंग करण्यापुर्वी 'हे' नियम नक्की वाचा ; रेल्वे मंत्र्यांकडून घोषणा

242
Tatkal Ticket Booking : रेल्वेचे तात्काळ बुकिंग करण्यापुर्वी 'हे' नियम नक्की वाचा ; रेल्वे मंत्र्यांकडून घोषणा
Tatkal Ticket Booking : रेल्वेचे तात्काळ बुकिंग करण्यापुर्वी 'हे' नियम नक्की वाचा ; रेल्वे मंत्र्यांकडून घोषणा

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केल्याप्रमाणे तात्काळ तिकिट बुकिंगच्या (Tatkal Ticket Booking) नियमात बदल करण्यात आले आहेत. या बदलांची अंमलबजावणी 1 जुलैपासून करण्यात येणार आहे. नव्या नियमांनुसार 1 जुलैपासून आयआरसीटीसी खातं आधार प्रमाणीकरण असेल त्यांनाच तात्काळ तिकिट काढता येणार आहे. (Tatkal Ticket Booking)

15 जुलैपासून आधार ओटीपी द्वारे पडताळणी प्रक्रिया झाल्यानंतर तात्काळ तिकीट बुकींग करता येईल. रेल्वेच्या तात्काळ तिकिटांची निष्पक्ष आणि पारदर्शक उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि प्रामाणिक प्रवाशांचे हित जपण्यासाठी भारतीय रेल्वेने तात्काळ तिकिट आरक्षण प्रणालीमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या असल्याचं जाहीर केलं. या सुधारणा यूजर्सचे प्रमाणीकरण अधिक काटेकोर करणे आणि तात्काळ तिकिटांचा गैरवापर कमी करण्याच्या उद्देशाने केल्या आहेत. (Tatkal Ticket Booking)

ऑनलाईन तात्काळ आरक्षणासाठी आधार प्रमाणीकरण
1 जुलैपासून आयआरसीटीसीचे अधिकृत संकेतस्थळ आणि मोबाईल अॅपद्वारे तात्काळ तिकिटांचे आरक्षण फक्त आधारने प्रमाणित केलेल्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असेल. याचसोबत 15 जुलै 2025 पासून ऑनलाइन तात्काळ तिकीट आरक्षणासाठी आधार-आधारित ओटीपी प्रमाणीकरण अनिवार्य असेल. (Tatkal Ticket Booking)

ओटीपी प्रमाणीकरण
संगणकीकृत प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) काउंटरवर आणि अधिकृत मध्यस्थांद्वारे (एजंट्स) आरक्षित तात्काळ तिकिटांसाठी आरक्षण करताना वापरकर्त्याने दिलेल्या मोबाइल क्रमांकावर ओटीपी प्रमाणीकरण पाठवणे आवश्यक असेल. ही तरतूद देखील 15 जुलै 2025 पासून लागू होईल. (Tatkal Ticket Booking)

आरक्षण वेळेचे निर्बंध
तात्काळ तिकिट बुकिंगच्या सुरुवातीच्या महत्त्वपूर्ण वेळेत होणाऱ्या बल्क बुकिंगला आळा घालण्यासाठी भारतीय रेल्वेच्या अधिकृत तिकीट एजंटना प्रारंभिक दिवस तात्काळ तिकिटे, बुकिंग विंडोच्या पहिल्या 30 मिनिटांच्या कालावधीत आरक्षित करता येणार नाहीत. वातानुकूलित श्रेणीतील तिकीट बुकिंगसाठी, हे निर्बंध सकाळी 10:00 ते 10:30 पर्यंत आणि बिगर वातानुकूलित श्रेणीसाठी, सकाळी 11:00 ते 11:30 या वेळेत लागू राहतील. (Tatkal Ticket Booking)

तात्काळ आरक्षणामध्ये पारदर्शकता सुधारण्यासाठी आणि योजनेचे फायदे खऱ्या अंतिम वापरकर्त्यांपर्यंत पोहोचण्याची सुनिश्चिती करण्यासाठी हे बदल करण्यात येत आहेत. (Tatkal Ticket Booking)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.