विदर्भातील (Bhandara News) अनेक भागांत वादळीवाऱ्याने थैमान घातले आहे. याचा मोठा फटका नागरिकांना बसला आहे. वादळीवाऱ्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात ५० हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे, तर भंडारा जिल्ह्यात ४५ फूट उंच बौद्ध मूर्ती कोसळली आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी ही नगरी प्राचीन बौद्ध नगरी म्हणून विदर्भात प्रसिद्ध आहे. (Bhandara News)
हेही वाचा-Cabinet Decision : विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
चंद्रमणी विहार समितीने अथक परिश्रम आणि बौद्ध उपासकांच्य सहकार्याने पवनी शहरात ४५ फूट उंच भव्य बौद्ध मूर्तीची (Bhandara News) स्थापना केली होती. मात्र, १० जून २०२५ च्या सायंकाळी वादळीवाऱ्यामुळे तथागतांची ही मूर्ती कोसळली. या वादळीवाऱ्यामुळे गावांतील अनेक घरांचे नुकसान झाले. झाडे कोसळल्याने पवनी-लाखांदूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. भंडारा जिल्ह्यात मंगळवारी दुपारनंतर वादळी वारे आणि रिमझिम पाऊस झाला. (Bhandara News)
हेही वाचा- BMC च्या भूखंड लिलावात वरळीचा भाव सरस; छत्रपती शिवाजी महाराज मंडईचा भाव पडला
पवनी तालुक्यातील आसगाव परिसरात वादळाचा जोर अधिक होता. त्यामुळे भेंडाळा, खैरी, दिवाण, मोखारा, वडेगाव घरांवरील पत्रे आणि छत उडाले, ज्यामुळे मोठे नुकसान झाले. याशिवाय, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांनाही वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. चंद्रपूरात मंगळवारी सायंकाळी पाऊस झाला. वादळी पावसामुळे अनेक भागांत झाडे उन्मळून पडली. ताडोबा मार्गावरील पदमापूर-मोहरली रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक कोंडी झाली, आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागल्या. (Bhandara News)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community