पंजाबच्या (Punjab) होशियारपूर (Hoshiarpur) जिल्ह्यामधील नूरपूर जट्टान गावतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या (Dr. Babasaheb Ambedkar) पुतळ्याची मोडतोड करण्यात आली. प्रतिबंधीत सिख फॉर जस्टिसचा (एसएफजे) दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने या घटनेची जबाबदारी घेतली आहे. आंबेडकरांच्या पुतळ्याला लक्ष्य करण्याची ही आठवडाभरातील दुसरी घटना आहे. यापूर्वी फगवाडाच्या फिल्लौर भागातही बाबासाहेबांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली होती. (Khalistani activities)
(हेही वाचा – Manipur Violence : पुन्हा हिंसक आंदोलने; मणिपूरला अशांत करण्याचा कोणाचा प्रयत्न ?)
यासंदर्भात गुरपतवंत सिंग पन्नूने (Gurpatwant Singh Pannu) या “आयकॉनोक्लास्टिक हल्ल्या” चे व्हिडिओ फुटेज जारी केले आहे. ज्यामध्ये असा दावा केला की नूरपूर जट्टान गावातील आंबेडकरांच्या पुतळ्याचे हात कापले आहेत. ही घटना कटरने घडवून आणण्यात आली. पुतळ्याजवळ खलिस्तानचा झेंडाही ठेवण्यात आला होता आणि “शीख हिंदू नाहीत” आणि “ट्रम्प झिंदाबाद” सारख्या प्रक्षोभक घोषणाही देण्यात आल्या होत्या. यासोबतच पन्नूचे वादग्रस्त विधानही प्रसिद्ध झाले आहे. ज्यामध्ये त्याने दावा केला आहे की – “आंबेडकरांचे संविधान ही ती चौकट आहे ज्या अंतर्गत जनरल जामवाल यांच्या नेतृत्वाखाली जून ते सप्टेंबर 1984 दरम्यान ‘ऑपरेशन वुड्रोज’ राबवण्यात आले. या अंतर्गत, 90 दिवसांत 15 हजारांहून अधिक शिखांना उचलून खटल्याशिवाय मारण्यात आले.”
यापूर्वी जालंधरच्या (Jalandhar) फिल्लौर येथील राधा स्वामी कॉलनीतील डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या पुतळ्याला काळे फासले होते. या घटनेनंतर, जालंधरचे एसएसपी हरविंदर सिंग विर्क यांनी पन्नूविरुद्ध यूएपीए आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला. त्यानंतर पन्नूने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला ज्यामध्ये दावा केला गेला की डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला एसएफजे संघटनेने काळे फासले आहे. पुतळ्यावर एसएफजेचे नाव लिहिले होते आणि खलिस्तानचा झेंडाही फडकवण्यात आला होता. (Khalistani activities)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community