Austria School Firing : मंगळवारी सकाळी ऑस्ट्रियातील ग्राझ येथील बोर्ग ड्रेयर्सचुत्झेंगासे माध्यमिक शाळेत (Borg Dreyerschutzengasse High School) अंदाधुंद गोळीबार झाला आहे. यामध्ये संशयित गोळीबार करणाऱ्यासह ११ जणांचा मृत्यू झाला. महापौर एल्के काहर यांच्या मते, मृतांमध्ये १० विद्यार्थी आणि एका प्रौढ व्यक्तीचा समावेश आहे. (Austria School Firing)
(हेही वाचा – रेल्वे स्थानकांवरील स्टॉल्स आठ दिवसांत हटवा, अन्यथा कारवाई करु ; Avinash Jadhav यांचा इशारा)
Firing in a school in Austria
Austria: A school in Graz, Austria, has tragically became the site of an attack.
Reports online have stated at least 8 people have been killed, teachers and student left injured, shortly before 10am as a student open fired into two classrooms, as… pic.twitter.com/33phxO8wC3— Pravin K. Prabhat (@pravinkashyap) June 10, 2025
गोळीबार करणारा विद्यार्थी
सकाळी १० वाजण्याच्या सुमारास एका संशयित विद्यार्थ्याने शाळेत अंदाधुंद गोळीबार केला. पोलिसांनी सांगितले की, गोळीबार कारणाऱ्या विद्यार्थ्याने नंतर आत्महत्या केली आणि त्याचा मृतदेह इमारतीच्या आत असलेल्या बाथरूममध्ये आढळला.
पोलिसांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून माहिती दिली की, शाळा रिकामी करण्यात आली आहे आणि सर्वांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे आणि आता कोणताही धोका नाही. ऑस्ट्रियाचे ग्राझ शहर देशाच्या आग्नेय भागात आहे. तसेच या शहाराची लोकसंख्या सुमारे ३,००,००० आहे. गोळीबारात काही लोक जखमी देखील झाले आहेत, ज्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
(हेही वाचा – हिंदू धर्माविरुद्ध आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्ट; Wazahat Khan याच्याविरोधात गुन्हा दाखल)
ग्राझ शहराचे महापौर एल्के काहर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेतील गोळीबाराची चौकशी करण्याची जबाबदारी स्पेशल टास्क फोर्सकडे सोपवण्यात आली आहे. ऑस्ट्रियाचे गृहमंत्री देखील ग्राझ शहराकडे रवाना झाले आहेत. पोलिसांनी लोकांना शांत राहण्याचे आणि अफवा पसरवण्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community