Bombay High Court : न्यायालयीन कामकाजाचे होणार थेट प्रक्षेपण, मुख्य न्यायाधीश काय म्हणाले?

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालया(Bombay High Court)चे कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. उच्च न्यायालया(Bombay High Court)चे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे व न्या. संदीप व्ही. मारणे यांच्या खंडपीठाने हा महत्त्चाचा निर्णय घेतला आहे.

556

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालया(Bombay High Court)चे कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. उच्च न्यायालया(Bombay High Court)चे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे व न्या. संदीप व्ही. मारणे यांच्या खंडपीठाने हा महत्त्चाचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, उच्च न्यायालया(Bombay High Court)च्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण व्हावे, याकरिता दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.(Bombay High Court)

(हेही वाचा Mumbai Airport Smuggling Case : वन्यजीव तस्करीचा भांडाफोड; बँकॉकहून परतणाऱ्या व्यक्तीच्या बॅगेत आढळले ‘हे’ दुर्मिळ प्राणी  )

विशेष म्हणजे, थेट प्रक्षेपणासंदर्भात जनहित याचिका(पीआयएल) वकील मॅथ्यूज जे नेदुम्पारा यांनी उच्च न्यायालया(Bombay High Court)त दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीत मंगळवार, १० जूनला मुंबई उच्च न्यायालयाने काही खंडपीठांचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी न्यायालया(Bombay High Court)ने सहमतीचा ठराव मंजूर केला आहे, असे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे यांनी सांगितले.

मुख्य न्यायाधीश आराधे व न्या. मारणे यांच्या खंडपीठाने काय म्हटले?

मुंबई उच्च न्यायालया(Bombay High Court)च्या न्यायालयीन कामकाजाचे थेट प्रक्षेपण सुरू करण्यासाठी तांत्रिक व्यवस्था केली जात आहे. त्यात आम्ही लक्षणीय प्रगती केली आहे. काही न्यायालयांचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी न्यायालयाने ठराव मंजूर केला आहे. यात पहिले पाच न्यायालये थेट प्रक्षेपित केली जातील, असे मुख्य न्यायाधीश आराधे आणि न्या. संदीप व्ही. मारणे यांच्या खंडपीठाकडून स्पष्ट करण्यात आले.(Bombay High Court)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.