हिंदू धर्माविरुद्ध आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्ट; Wazahat Khan याच्याविरोधात गुन्हा दाखल

79
हिंदू धर्माविरुद्ध आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्ट; Wazahat Khan याच्याविरोधात गुन्हा दाखल
  • प्रतिनिधी 

ट्विटर, फेसबुक आणि व्हॉट्सअॅप यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील आक्षेपार्ह सामग्रीवर लक्ष ठेवल्याबद्दल आयटी सेलचे अध्यक्ष रमेश सोलंकी (४२) यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून एलटी मार्ग पोलीस ठाण्यात वजाहत खान (Wazahat Khan) नावाच्या ट्विटर वापरकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, १३ डिसेंबर २०२३ रोजी वजाहत खान यांनी त्यांचे ट्विटर हँडल @rashidiwazahat वापरून हिंदू धर्माला लक्ष्य करणारी आक्षेपार्ह आणि अश्लील आशय असलेली पोस्ट केली होती. विशेषतः आसाममधील पूजनीय कामाख्या देवी मंदिराशी संबंधित आक्षेपार्ह पोस्ट केली होती.

(हेही वाचा – Hepatitis in Kerala : केरळमध्ये कोरोनानंतर आता हेपेटायटीसच्या रुग्णांमध्ये वाढ)

या पोस्टमध्ये कामाख्या देवीचा फोटो आणि इंग्रजीमध्ये अश्लील आणि अपमानजनक कॅप्शन असल्याचा आरोप तक्रारदार सोलंकी यांनी केला आहे. शिवाय, या पोस्टवर इतर वापरकर्त्यांकडून हिंदू देवतांबद्दल अनेक अश्लील आणि बदनामीकारक टिप्पण्या आल्या. सोलंकी यांनी सांगितले की, त्याच ट्विटर अकाउंटने २५ मार्च २०२४ आणि १५ मे २०२५ रोजीही अशाच प्रकारची आक्षेपार्ह सामग्री प्रकाशित केली होती. ज्यामध्ये पुन्हा एकदा हिंदू देवता आणि श्रद्धा यांना लक्ष्य केले गेले होते. कामाख्या देवीचे भक्त म्हणून ओळख असलेले सोलंकी म्हणाले की, अशा पोस्ट त्यांच्या धार्मिक भावनांना खोलवर दुखावतात आणि सांप्रदायिक अशांतता निर्माण करण्याच्या आणि शांतता भंग करण्याच्या उद्देशाने केल्या जात आहेत.

(हेही वाचा – Mumbra Train Accident : मानवी हक्क आयोगाकडे तक्रार; दुर्घटना प्रकरणी चौकशीची मागणी)

भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या खालील कलमांखाली वजाहत खानविरुद्ध कलम १९२ – खोटी आणि आक्षेपार्ह सामग्री प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे, कलम १९६(१), १९७(१) – धार्मिक आधारावर वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व निर्माण करणारी विधाने, कलम २९९ – शांतता भंग करण्याच्या उद्देशाने कृती,आणि आयटी कायद्याचे कलम ६७ – इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अश्लील सामग्री प्रकाशित करणे किंवा प्रसारित करणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलीस सूत्रांनी सांगितले की, आरोपी वजाहत खान (Wazahat Khan) हा पश्चिम बंगालचा रहिवासी आहे, पोलीस त्याला लवकरच अटक करतील.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.