Mumbai Airport Smuggling Case : वन्यजीव तस्करीचा भांडाफोड; बँकॉकहून परतणाऱ्या व्यक्तीच्या बॅगेत आढळले ‘हे’ दुर्मिळ प्राणी 

आठ दिवसांतील दुसरी कारवाई

202
बँकॉक (Bangkok) येथून मुंबईत दाखल झालेल्या एका भारतीय प्रवाशाकडे दुर्मीळ सरडे, पांढरे उंदीर, रंगीत कासवे तसेच अन्य काही छोटेखानी प्राण्यांच्या तस्करी (Animals Smuggling) प्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे दुर्मीळ प्रजातीचे ९४ प्राणी आढळले. (Mumbai Airport Smuggling Case)

(हेही वाचा – Infinix GT 30 Pro : मोबाईल गेम खेळणाऱ्यांना २५,००० रुपयांच्या आतील स्वस्त पर्याय उपलब्ध)

हा प्रवासी मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) दाखल झाला त्यावेळी अधिकाऱ्यांना त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे त्यांनी त्याची चौकशी केली. चौकशीदरम्यान हा प्रवासी घाबरला आणि त्याने हे छोटेखानी प्राणी (Animal)  अधिकाऱ्यांना दाखवले. या सर्व दुर्मीळ प्राण्यांवर वन्य जीव कायद्यान्वये भारतात बंदी आहे.

(हेही वाचा – CM Yogi Adityanath यांच्या दौऱ्यापूर्वी सापडली ५०० किलो स्फोटके; ७० जणांना अटक)

या प्राण्यांची वैद्यकीय तपासणी करून लवकरच त्यांच्या नैसर्गिक अधिवासात त्यांना पाठवण्यात येणार आहे. १ जून रोजी मुंबई विमानतळावरील सीमा शुल्क विभागाने (Customs Department) अशाच प्रकारे ४४ विविध दुर्मीळ प्रजातींच्या प्राण्यांची तस्करी पकडली होती. या घटनेमुळे विमानतळ परिसरात खळबळ माजली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.