Infinix GT 30 Pro : मोबाईल गेम खेळणाऱ्यांना २५,००० रुपयांच्या आतील स्वस्त पर्याय उपलब्ध

Infinix GT 30 Pro : मजबूत वेग आणि मोठी बॅटरी हे फोनचं वैशिष्ट्य आहे. 

40
Infinix GT 30 Pro : मोबाईल गेम खेळणाऱ्यांना २५,००० रुपयांच्या आतील स्वस्त पर्याय उपलब्ध
  • ऋजुता लुकतुके

इन्फिनिक्स या कंपनीने भारतातील परवडणाऱ्या मोबाईल फोनच्या बाजारपेठेत आपल्या जीटी ३० प्रो फोनने मोठी मुसंडी मारली आहे. गेमिंगचे चाहते असलेल्या तरुणांसाठी हा फोन मोठी पर्वणी आहे. कारण, फोनची बॅटरी ५,५०० एमएएच अशी तगडी आहे. मीडियाटेक डिमेन्सिटी ८३५० अल्टिमेट प्रोसेसरमुळे हा फोन एकापेक्षा जास्त काम अगदी आरामात करू शकतो. शिवाय या फोनचा लुकही हा गेमिंग फोन आहे असंच दाखवणारा आहे. (Infinix GT 30 Pro)

आतापर्यंत पोकोचा एक्स७ प्रो आणि आयक्यूओओ निओ १०आर हे फोन हे गेमिंगसाठी भारतात ओळखले जायचे. आता इन्फिनिक्स जीटी ३० प्रोने या स्पर्धेला तगडं आव्हान दिलं आहे. ज्यांना जीटी २० प्रो हा कंपनीचा आधीचा फोनही आवडला होता, त्यांच्यासाठी सांगण्यासारखं म्हणजे नवीन फोनमध्ये कामगिरी, वेग आणि इतर प्रत्येक बाबतीत कंपनीने सुधारणा केली आहे. ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजचा पहिला फोन आहे आणि त्याची किंमत २४,९९९ रुपये इतकी आहे. तिथून पुढे २६,९९९ रुपयांपर्यंत तुम्हाला विविध पर्याय उपलब्ध होऊ शकतील. (Infinix GT 30 Pro)

(हेही वाचा – Tata Harrier EV : टाटा मोटर्सच्या हॅरियर ईव्हीमध्ये आहेत हे ५ असे फिचर जे इतर गाड्यांमध्ये नाहीत)

हा गेमिंग फोन असल्यामुळे अगदी कॅमेरा आणि इतर गोष्टींवरही फारसं लक्ष दिलेलं नाही. त्यामुळे मोबाईल डिझाईन करताना पाठीमागे कॅमेरासाठी कमीत कमी जागा आहे. फोनची मागची केसही हा गेमिंग फोन असल्याचं दाखवते. त्यावर कोडिंगचे आकार आहेत. फोनचा डिस्प्ले ६.७ इंचांचा मोठा आहे. त्याचा रिफ्रेश रेट १४४ हर्ट्झ इतका आहे. १.५ के इतकं रेझोल्युशन आहे. या प्रखर डिस्प्लेमुळे फोनवर गेम खेळणं आणि व्हिडिओ बघणं हे दोन्ही अनुभव सुखद असतील. (Infinix GT 30 Pro)

हा कॅमेरा फर्स्ट फोन नसला तरी प्राथमिक कॅमेराच १०८ मेगापिक्सेलचा आहे. त्याबरोबरीने ८ मेगापिक्सेलची अल्ट्रावाईड लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी कॅमेरा १२ मेगापिक्सेलचा आहे. फोनचा मीडियाटेक डिमेन्सिटी ८३५० हा प्रोसेसर हे फोनचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे मोबाईल फोनला वेग मिळाला आहे. एकाचवेळी अनेक कामं फोनवर करायची असतील तरीही ते सोपं होतं. तर ३० वॅट्सचा वायरलेस चार्जर वापरलात तर अगदी ३० मिनिटांत हा फोन संपूर्ण चार्ज होऊ शकेल. (Infinix GT 30 Pro)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.