
शिवाजीनगर हे पुणे शहरातलं एक उपनगर आहे. त्याला भांबवडे किंवा भांबुर्डे म्हणूनही ओळखलं जातं.
शिवजीनगरचा इतिहास
शिवाजीनगरला खूप मोठा इतिहास आहे. शिवाजीनगर इथे ८ व्या शतकातलं राष्ट्रकूट काळात बांधलं गेलेलं पाताळेश्वर गुहा मंदिर आहे. हे पुण्यातलं सर्वांत जुनं मानवनिर्मित बांधकाम आहे असं म्हणतात.
फार पूर्वी या परिसरामध्ये ‘भांबवडे’ म्हणून ओळखलं जाणारं एक गाव होतं. पुढे कालांतराने त्या गावाचं नाव ‘भांबुर्डे’ असं बदललं गेलं. मराठा साम्राज्यात आणि त्यानंतर ब्रिटिश राजवटीमध्ये भांबुर्डे गावचे पाटील हे शिरोळे पाटील कुटुंबातले होते. त्यांच्या कुटुंबातल्या कित्येक सदस्यांनी मराठा सैन्यातही कामगिरी बजावली होती. पेशव्यांच्या काळामध्ये या गावात हस्तनिर्मित कागदाचा कारखानाही होता. (shivajinagar)
१९ व्या शतकामध्ये जंगली महाराज या गावात स्थायिक झाले. त्यांची समाधी आणि मंदिर सध्या शिवाजीनगरमध्ये आहे. याव्यतिरिक्त या परिसरातल्या एका मोठ्या रस्त्याला त्यांचं नावही देण्यात आलं आहे. भांबुर्डे इथले इनामदार आणि पाटील राजाराम नारोजी शिरोळे पाटील यांनी १८८५ साली हनुमान टेकडीच्या पायथ्याशी असलेली ३७ एकर एवढी जमीन डेक्कन एज्युकेशन सोसायटीला ९९ वर्षांसाठी भाड्याने दिली होती. तेव्हा डेक्कन एज्युकेशन सोसायटीची सर्वांत प्रसिद्ध असलेली संस्था म्हणजेच ‘फर्ग्युसन कॉलेज’ हे या जमिनीवर बांधलं गेलं.
२० व्या शतकाच्या सुरुवातीला पुण्यातली सर्वांत जुनी आणि सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेली वडारवाडी ही होती. ही झोपडपट्टी चतुर्श्रृंगी मंदिराजवळ आणि हनुमान टेकडीच्या पायथ्याशी शिरोळे पाटील कुटुंबाच्या वापरात नसलेल्या जमिनीवर वसली. सध्याच्या सेनापती बापट रोडजवळ ही वस्ती वसली. वडारवाडीमध्ये पूर्वी प्रामुख्याने भटक्या वडार समुदायाचे वास्तव्य होतं. १९२८ साली शिवाजीनगर या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापित करण्यात आली होती. त्यानंतर तिथे जवळच श्री शिवाजी मिलिटरी प्रिपरेटरी स्कूलची स्थापना करण्यात आली. (shivajinagar)
(हेही वाचा – देशात Corona च्या सक्रिय रुग्णांची संख्या सात हजारांवर ! गेल्या २४ तासांत तिघांचा मृत्यू)
१९४७ साली भारताने स्वातंत्र्य मिळवल्यानंतर ‘भांबुर्डे’ गावाचं नाव बदलून ‘शिवाजीनगर’ असं ठेवण्यात आलं.
शिवाजीनगर इथे असणाऱ्या संस्था
शिवाजीनगर या परिसरात कित्येक केंद्रीय राज्य आणि स्थानिक सरकारी कार्यालयं आहेत. त्यांमध्ये खाली दिलेल्या कार्यालयांचा समावेश आहे.
- पुणे जिल्हा न्यायालय
- पुणे महानगरपालिका
- भारतीय हवामान विभाग – पुणे प्रादेशिक कार्यालय हे शिमला कार्यालय म्हणून प्रसिद्ध आहे.
- ऑल इंडिया रेडिओ – आकाशवाणी भवन, पुणे
- कॉग्निझंट कंपनी
- आयसीसी टॉवर
- बँक ऑफ इंडिया झोनल ऑफिस, पुणे (shivajinagar)
(हेही वाचा – CM Yogi Adityanath यांच्या दौऱ्यापूर्वी सापडली ५०० किलो स्फोटके; ७० जणांना अटक)
शैक्षणिक संस्था
या परिसरात फर्ग्युसन कॉलेज, मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स शिवाजीनगर, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि कृषी महाविद्यालय अशा अनेक प्रसिद्ध शैक्षणिक संस्था आहेत. ज्यांचा इतिहास फार जुना आहे.
विद्यापीठे आणि महाविद्यालये
- इंडियन लॉ सोसायटीचे लॉ कॉलेज
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ – पूर्वीचे “पुणे विद्यापीठ”
- मराठवाडा मित्र मंडळ वाणिज्य महाविद्यालय
- फर्ग्युसन कॉलेज
- बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय
- सिम्बायोसिस कॉलेज
- मॉडर्न कॉलेज
- हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज
- अभियांत्रिकी महाविद्यालय
- कृषी महाविद्यालय
- GIPE – गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स (shivajinagar)
(हेही वाचा – Los Angeles मधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ७०० मरीन कमांडो तैनात !)
शाळा
- भारत इंग्लिश स्कूल (पुणे)
- मॉडर्न स्कूल (पुणे)
- भारतीय विद्या भवन
- विद्या भवन हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज
- सिम्बायोसिस इंटरनॅशनल स्कूल
- श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल (पुणे) (shivajinagar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community