सरावादरम्यान उपकर्णधार Rishabh Pant दुखापतग्रस्त ! कसोटीपूर्वी टीम इंडियाची चिंता वाढली

44
सरावादरम्यान उपकर्णधार Rishabh Pant दुखापतग्रस्त ! कसोटीपूर्वी टीम इंडियाची चिंता वाढली
सरावादरम्यान उपकर्णधार Rishabh Pant दुखापतग्रस्त ! कसोटीपूर्वी टीम इंडियाची चिंता वाढली

शुभमन गिलच्या (Shubman Gill) नेतृत्वाखाली खेळणार भारतीय संघ पाच कसोटी मालिकेसाठी (Test Series) इंग्लंडमध्ये (England) दाखल झाला आहे. पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाने कसून सरावाला सुरुवातही केली आहे. मात्र, भारतीय संघाचा सराव सुरु असताना उपकर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) दुखापतग्रस्त झाला आहे.

पंतच्या डाव्या हाताला दुखापत झाल्याचे वृत्त आहे. दुखापत झाल्यानंतर पंतवर तात्काळ उपचार करण्यात आले. यानंतर तो मैदानाबाहेर गेला आणि उर्वरित सरावामध्ये सहभागी होऊ शकला नाही. उपकर्णधार पंत दुखापतग्रस्त झाला असला तरी, तो पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी पुर्णपणे तंदुरुस्त होईल अशी माहिती आहे.

(हेही वाचा – IAS Officer Diman Chakma : 10 लाखांची लाच घेताना IAS अधिकारी अडकला जाळ्यात ; घरातून 47 लाखांची रोकड जप्त)

जर पंत तंदुरुस्त झाला नाही तर ध्रुव जुरेलचा (Dhruv Jurel) पर्याय टीम इंडियासमोर उपलब्ध आहे. दरम्यान, भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) खेळला होता. त्यावेळी ५ कसोटी मालिकेत २८.३३ च्या सरासरीने पंतला केवळ २५५ धावाच करता आल्या होत्या. त्याचप्रमाणे आयपीएलमध्येही त्याला लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.

१४ सामन्यात २४.६९ च्या सरासरीने २६९ धावाच करण्यात यश आलं. कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघ १३ जूनला इंट्रा स्कॉड सामना खेळणार आहे. त्यापूर्वी पंत तंदुरुस्त होईल अशी शक्यता आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.