ICCच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश मिळवणारा MS Dhoni ११ वा भारतीय !

ICCच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश मिळवणारा MS Dhoni ११ वा भारतीय !

53
ICCच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश मिळवणारा MS Dhoni ११ वा भारतीय !
ICCच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश मिळवणारा MS Dhoni ११ वा भारतीय !

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा (MS Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे. आयसीसीने सोमवारी याची घोषणा केली. धोनी हा सन्मान मिळवणारा ११वा भारतीय खेळाडू ठरला आहे. आयसीसीने धोनीच्या कारकिर्दीबद्दल म्हटले आहे की, “१७,२६६ आंतरराष्ट्रीय धावा, ८२९ झेल आणि ५३८ सामने… हे आकडे केवळ त्याच्या प्रतिभेचेच नव्हे तर त्याच्या सातत्य, तंदुरुस्ती आणि दीर्घ कारकिर्दीचेही पुरावे आहेत.” (MS Dhoni)

हेही वाचा-IAS Officer Diman Chakma : 10 लाखांची लाच घेताना IAS अधिकारी अडकला जाळ्यात ; घरातून 47 लाखांची रोकड जप्त

या सन्मानाबद्दल प्रतिक्रिया देताना धोनी (MS Dhoni) म्हणाला, “आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळणे हा एक मोठा सन्मान आहे. जगभरातील दिग्गज खेळाडूंच्या यादीत माझे नाव पाहणे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी हा क्षण नेहमीच जपून ठेवेन.” (MS Dhoni)

हेही वाचा- Mumbai Railway Accident : एकुलता एक कमावणारा मुलगा गेला ! गरिबीत शिकून सेल्समन झालेल्या 23 वर्षाच्या केतनचा मुंब्रा अपघातात मृत्यू

आयसीसीने २०२५च्या हॉल ऑफ फेमच्या यादीत एकूण ७ खेळाडूंचा समावेश केला आहे. यामध्ये ५ पुरुष आणि २ महिला खेळाडूंचा समावेश आहे. पुरुष खेळाडूंमध्ये दक्षिण आफ्रिकेचा हाशिम अमला, भारताचा महेंद्रसिंह धोनी, ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडन, दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ आणि न्यूझीलंडचा डॅनियल व्हेटोरी यांचा समावेश आहे. महिला क्रिकेटपटूंमध्ये पाकिस्तानच्या सना मीर आणि इंग्लंडच्या सारा टेलर यांना हा सन्मान मिळाला आहे. (MS Dhoni)

हेही वाचा- Mumbai Railway Accident : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबई लोकल ट्रेन अपघातावर एका वाक्यात विषय संपवला !

आयसीसीचे अध्यक्ष जय शाह म्हणाले की, हॉल ऑफ फेमच्या माध्यमातून आम्ही अशा खेळाडूंचा सन्मान करतो, ज्यांनी उत्तम खेळ दाखवून क्रिकेटला खास बनवले आणि नवीन पिढ्यांना प्रेरणा दिली. जय शाह म्हणाले, “या वर्षी आपल्याला आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये ७ महान खेळाडूंचा समावेश करण्याची संधी मिळाली आहे. मी आयसीसीच्या वतीने सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो. आशा आहे की हा सन्मान त्यांच्यासाठी एक संस्मरणीय क्षण असेल.” (MS Dhoni)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.