
ओडिशाच्या कालाहांडी जिल्ह्यात, ३६ वर्षीय आयएएस अधिकारी धीमान चकमा (IAS Officer Diman Chakma) यांना १० लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सोमवारी, त्यांना भवानीपटना येथील विशेष न्यायाधीश दक्षता यांनी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले. धीमान यांना रविवारी अटक करण्यात आली होती. (IAS Officer Diman Chakma)
नेमकं काय घडलं ?
दक्षता अधिकाऱ्यांनी सांगितले की, धीमान (IAS Officer Diman Chakma) यांनी एका व्यावसायिकाकडून २० लाख रुपयांची मागणी केली होती. पैसे न दिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची धमकीही त्यांनी दिली. व्यावसायिकाने या प्रकरणाची माहिती दक्षता अधिकाऱ्यांना दिली. तक्रारीच्या आधारे, दक्षता पथकाने ८ जूनच्या रात्री सापळा रचला आणि आयएएस अधिकारी धीमान यांना कालाहांडी जिल्ह्यातील धर्मगढ येथील त्यांच्या अधिकृत निवासस्थानातून १० लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. (IAS Officer Diman Chakma)
आयएएस अधिकारी धीमान चकमा कोण आहेत ?
दक्षता पथकाने आयएएस अधिकाऱ्याच्या अधिकृत निवासस्थानाची आणि त्यांच्या कार्यालयाचीही झडती घेतली. या दरम्यान, क्वार्टरमधून ४७ लाख रुपये जप्त करण्यात आले. मूळचा त्रिपुराचा रहिवासी असलेला धीमान हा २०२१ च्या बॅचचा आयएएस अधिकारी आहे. त्यांनी देशातील सर्वात कठीण परीक्षा यूपीएससी एकदा नाही, तर दोनदा उत्तीर्ण केली आहे. २०१९ मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, ते ओडिशा केडरमध्ये भारतीय वन सेवा (आयएफएस) अधिकारी म्हणून रुजू झाले.
आयएफएस अधिकारी म्हणून प्रशिक्षण घेतल्यानंतर, धीमान (IAS Officer Diman Chakma) यांनी जून २०२१ पासून मयूरभंजमधील बारीपाडा येथे अतिरिक्त मुख्य वनसंरक्षक म्हणून काम केले. तथापि, त्यांनी २०२१ मध्ये पुन्हा नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्यांना आयएएस अधिकारी म्हणून ओडिशा केडरमध्ये नियुक्त करण्यात आले. प्रशिक्षणानंतर, ते जानेवारी २०२४ मध्ये कालाहांडीतील धर्मगढ येथे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. (IAS Officer Diman Chakma)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community