Mumbai Railway Accident : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबई लोकल ट्रेन अपघातावर एका वाक्यात विषय संपवला !

Mumbai Railway Accident : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबई लोकल ट्रेन अपघातावर एका वाक्यात विषय संपवला !

218

मुंबईवरून (Mumbai Railway Accident) कर्जतकडे आणि कसाऱ्याहून मुंबईकडे जाणाऱ्या जलद लोकल ट्रेनच्या दरवाजात लटकणारे प्रवासी परस्परांना धडकल्याने सोमवारी सकाळी मुंब्र्यात झालेल्या भीषण अपघातात (Mumbai Railway Accident) ४ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर ९ जखमी झाले. काहींची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेवर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना विचारले असता, त्यांनी मुंबई लोकल ट्रेन अपघातावर एका वाक्यात विषय संपवला. (Mumbai Railway Accident)

‘मोदी 3.0’ सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सोमवारी दिल्लीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह अश्विनी वैष्णवही उपस्थित होते. यावेळी एक पत्रकार परिषदही पार पडली. त्यावेळी एका पत्रकाराकडून रेल्वेमंत्री अश्निनी वैष्णव यांना मुंबईतील ट्रेन अपघातावर प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा अश्निनी वैष्णव यांनी या विषयावर बोलणे टाळले. (Mumbai Railway Accident)

हेही वाचा-Chhatrapati Shivaji Maharaj : “छत्रपती शिवरायांचा इतिहास सीबीएससी अभ्यासक्रमात समाविष्ट करा”; खासदार रविंद्र वायकर यांची केंद्राकडे मागणी

“रेल्वे मंत्रालयाने मुंबईतील अपघाताबाबत पत्रक काढले आहे. त्यामुळे या मुद्द्यावर अधिक बोलण्याची आवश्यकता नाही,” असे सांगून रेल्वेमंत्री तिथून निघून गेले. (Mumbai Railway Accident)

जखमी प्रवासी
आदेश भोईर (२६, रा. आटगाव, कसारा), रिहान शेख (२६, भिवंडी), तुषार भगत (२२), मनीष सरोज (२६ दिवा साबेगाव, दिवा), मच्छिंद्र गोतारणे (३९, वाशिंद), स्नेहा धोंडे (२१, रा. टिटवाळा), प्रियंका भाटिया (२६ रा. शहाड, कल्याण) या सात जणांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Mumbai Railway Accident)

चिंताजनक
शिवा गवळी (२३), अनिल मोरे (४०). (Mumbai Railway Accident)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.