शर्मिष्ठा पानोलीविरोधात तक्रार दाखल करणाऱ्या Wazahat Khan याला कोलकाता येथून अटक

Wazahat Khan : हिंदू देवता आणि मंदिरांविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट पोस्ट केल्याबद्दल वजाहत खान(Wazahat Khan)ला कोलकाता पोलिसांनी अटक केली आहे. वजाहत(Wazahat Khan) हा तोच व्यक्ती आहे ज्याने अलीकडेच सोशल मीडियावरील प्रभावशाली आणि कायद्याची विद्यार्थिनी शर्मिष्ठा पानोलीविरुद्ध तक्रार दाखल केली होती.

156

Wazahat Khan : हिंदू देवता आणि मंदिरांविरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट पोस्ट केल्याबद्दल वजाहत खान(Wazahat Khan)ला कोलकाता पोलिसांनी अटक केली आहे. वजाहत(Wazahat Khan) हा तोच व्यक्ती आहे ज्याने अलीकडेच सोशल मीडियावरील प्रभावशाली आणि कायद्याची विद्यार्थिनी शर्मिष्ठा पानोलीविरुद्ध तक्रार दाखल केली होती. तपासानंतर त्याच्या सोशल मीडियावर वर्षानुवर्षे हिंदू देवतांबद्दल द्वेषपूर्ण पोस्ट उघड झाल्या. यापूर्वीही त्याच्याविरुद्ध अनेक तक्रारी आल्या होत्या, पण कोलकाता पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचे उघड झाले होते.(Wazahat Khan)

 

(हेही वाचा वजाहत खानचे पाकिस्तान कनेक्शन Wajahat Khan Sharmistha Panoli )

दरम्यान, वजाहत खान(Wazahat Khan) याने माँ कामाख्या देवीबद्दल अतिशय अश्लील आणि आक्षेपार्ह टिप्पण्याही केली होती. धार्मिक भावना भडकवण्याचा आणि द्वेष पसरवण्याचा गंभीर आरोप वजाहतवर लावण्यात आले आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वजाहत खान(Wazahat Khan) १ जूनपासून फरार होता. त्याला तीन वेळा नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. परंतु, त्याने हजर राहण्यास नकार दिला. त्यानंतर गार्डन रीच परिसरातील त्याच्या निवासस्थानीही अनेक वेळा छापे टाकण्यात आले. अखेर सोमवारी रात्री कोलकाता येथील अमहर्ष स्ट्रीट परिसरातील एका गुप्त ठिकाणाहून वजाहत खानला अटक करण्यात आली.

(हेही वाचा Wajahat Khan विरोधात सुनील पवारांची शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल; तक्रार अर्ज आसामला पाठवणार )

महत्त्वाचे म्हणजे, वजाहत(Wazahat Khan)विरोधात कोलकाता येथील गोल्फ ग्रीन पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर देखील दाखल करण्यात आली. सोशल मीडियावर हिंदू धर्म, देवता आणि धार्मिक परंपरांविरुद्ध त्यांनी भडकाऊ, अश्लील आणि अपमानास्पद भाषा वापरली असल्याचा आरोप आहे. या संदर्भात ‘श्रीराम स्वाभिमान परिषद’ नावाच्या संघटनेने २ जून रोजी गार्डन रीच पोलिस स्टेशनमध्ये औपचारिक तक्रार दाखल केली.

शर्मिष्ठा पानोलीविरोधात केली होती एफआयआर

सोशल मीडिया इन्फ्ल्युन्सर शर्मिष्ठा पानोलीला कोलकाता पोलिसांनी ३० मे रोजी गुरुग्राम येथून अटक केली होती. ‘ऑपरेशन सिंदूर’ बद्दल मुस्लिम बॉलीवूड कलाकारांच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा व्हिडिओ तिने पोस्ट केला होता. त्या व्हिडिओमध्ये तिने जातीय आणि आक्षेपार्ह भाषा वापरली असल्याचा आरोप आहे. तथापि, नंतर तिने व्हिडिओ काढून टाकला आणि माफीही मागितली.

न्यायालयाने आता शर्मिष्ठा पानोली यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. १०,००० रुपयांचा जातमुचलक्यासह देश न सोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.तसेच, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे हुकूमशाही नाही आणि कोणत्याही धर्माच्या किंवा समुदायाच्या भावना दुखावण्यासाठी त्याचा गैरवापर केला जाऊ शकत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.(Wazahat Khan)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.