Mumbra Train Accident : मुख्यमंत्री फडणवीसांची तात्काळ दखल; अपघाताची चौकशी सुरू, मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत

58
Mumbra Train Accident : मुख्यमंत्री फडणवीसांची तात्काळ दखल; अपघाताची चौकशी सुरू, मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत
  • प्रतिनिधी

मुंब्रा स्थानकाजवळ दिवा-मुंब्रा दरम्यान घडलेल्या ह्रदयद्रावक लोकल अपघातानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ दखल घेत दुर्घटनेतील मृत प्रवाशांना श्रद्धांजली अर्पण केली आणि त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, दुर्घटनेतील जखमींवर तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून, ज्युपिटर रुग्णालयातही दोन गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत. राज्य शासनाने या सर्व उपचारांचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला आहे. (Mumbra Train Accident)

रेल्वे विभागाकडून अपघाताची चौकशी सुरू – फडणवीस यांची माहिती

“ही घटना नक्की कशामुळे घडली, याची चौकशी रेल्वे विभागाकडून सुरू झाली आहे,” अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून सर्व आवश्यक मदत आणि व्यवस्था करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (Mumbra Train Accident)

(हेही वाचा – Mumbra Train Accident : मुंब्रा येथे ट्रेन अपघातात जीआरपीच्या कॉन्स्टेबलचा मृत्यू)

“जखमींना ५० हजार ते २ लाखांपर्यंत मदत; सरकारकडून संपूर्ण उपचार खर्च” – गिरीश महाजन

राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, जखमींना त्यांच्या जखमेच्या तीव्रतेनुसार ५० हजार ते २ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाणार असून त्यांचे उपचार संपूर्णपणे शासन खर्चातून केले जातील. मृतांच्या कुटुंबीयांसाठीही सर्वतोपरी मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे. (Mumbra Train Accident)

मुख्यमंत्र्यांकडून भावनिक श्रद्धांजली

“दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी आणि संपूर्ण शासन सहभागी आहोत,” असे भावनिक शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच त्यांनी ईश्वरचरणी प्रार्थना केली की जखमींना लवकरात लवकर आराम व बरे वाटावे. मुंब्रा अपघातानंतर मुख्यमंत्री, मंत्री आणि प्रशासन यांच्याकडून ज्या तत्परतेने मदत कार्य उभारण्यात आले आहे, त्यावरून सरकारचा संवेदनशील दृष्टिकोन स्पष्ट होतो. मात्र या प्रकारातून पुन्हा एकदा मुंबई लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. (Mumbra Train Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.