Suicide Case : धक्कादायक! ६२ वर्षीय पतीने पत्नीसह स्वतःवर गोळी झाडत केली आत्महत्या

100
Suicide Case : धक्कादायक! ६२ वर्षीय पतीने पत्नीसह स्वतःवर गोळी झाडत केली आत्महत्या
  • प्रतिनिधी 

६२ वर्षांच्या व्यक्तीने ५८ वर्षीय पत्नीवर गोळी झाडून हत्या केल्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना वरळीतील सिद्धार्थ नगर येथे रविवारी सकाळी घडली. याप्रकरणी वरळी पोलिसांनी मृत ६२ वर्षीय पतीवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. ही हत्या घरगुती कलहातून झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. राजमोहन नामपिल्ली हे पत्नी लता आणि मुलगा आणि पुतण्यासह वरळीच्या सिद्धार्थ नगर येथील पंकज मॅन्शनमधील दुसऱ्या मजल्यावर राहण्यास होता. राजमोहन नामपल्ली हा वायरमन होता व परिसरात छोटेमोठे कंत्राट घेत होता. (Suicide Case)

वरळी पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रविवारी पहाटे गोळीबाराच्या आवाजाने नामपल्लीचा पुतण्या जागा झाला. जो दोन बेडरूममधील पॅसेजमध्ये झोपला होता. जेव्हा त्याने नामपिल्लीला मोठा आवाज आणि धुराबद्दल विचारले तेव्हा त्याने त्याला सांगितले की, एक छोटासा शॉर्ट सर्किट झाला आहे आणि सर्व काही ठीक आहे. त्यानंतर नामपल्लीने त्याला पुन्हा झोपायला सांगितले. काही मिनिटांनंतर, नामपल्ली कथितपणे बाहेर पडला आणि इमारतीच्या जिन्यावर बसला, जिथे त्याने डोक्यात गोळी झाडून घेतली. (Suicide Case)

(हेही वाचा – Operation SINDOOR : भारताचे संरक्षण प्रमुख सांगतात, युद्धामध्ये क्षति झाली होती)

ही घटना तेव्हा उघडकीस आली जेव्हा वृत्तपत्र विक्रेत्याला नामपल्ली रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला आणि त्याने इमारतीच्या वॉचमनला कळवले. फ्लॅटमध्ये प्रवेश केल्यावर, वॉचमनला नामपल्लीची पत्नी लता ही रक्ताच्या थारोळ्यात निपचित आढळून आली. त्याने कुटुंब आणि पोलिसांना कळवले. नामपल्ली आणि लता दोघांनाही परळ येथील केईएम रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनास्थळावरून पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले देशी बनावटीचे पिस्तूल जप्त केले. (Suicide Case)

प्राथमिक चौकशीत असे दिसून आले की नामपिली हा पूर्वी कतारमध्ये इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत होता आणि काही वर्षांपूर्वी तो भारतात परतला होता. त्याच्या मुलाचे लग्न २०२३ मध्ये झाले होते. मुलांमध्ये आणि नामपल्लीमध्ये घराला घेऊन वाद होता, त्यात पत्नी मुलाच्या बाजूने असल्यामुळे नामपल्लीला त्याचा राग होता. त्यातून हा प्रकार घडला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. (Suicide Case)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.