‘आपल्या देशात माणसांची किंमत नाही’; मुंबई लोकल दुर्घटनेवर Raj Thackeray संतापले 

175
BMC Election : मनसेत खलबतं सुरू; युती की स्वबळाचा मार्ग?, १२५ प्रभागांवर पक्षाकडून मोर्चेबांधणी
BMC Election : मनसेत खलबतं सुरू; युती की स्वबळाचा मार्ग?, १२५ प्रभागांवर पक्षाकडून मोर्चेबांधणी
मध्य रेल्वेच्या दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान सोमवारी ०९ जूनला सकाळी ट्रेनमधून पडून सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे माहिती समोर आली. फास्ट लोकल एकमेकांच्या शेजारुन जात असताना हा अपघात झाला. या घटनेवरुन आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया येत आहेत. या प्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. (Raj Thackeray)
(हेही वाचा – Cargo ship fire : केरळमधील बेपोर किनाऱ्याजवळ मालवाहू जहाजाला आग; बचाव मोहीम सुरू)
मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Raj Thackeray) हे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, मुंबईमध्ये रेल्वे अपघाताची घटना दुर्दैवी आहे. या देशात माणसांची किंमत नाही. मुंबईमधील रेल्वे कशी चालते हे जगाला आश्चर्य आहे, अशी प्रतिक्रिया देत ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. मुंबईमध्ये हा विषय फक्त रेल्वेसाठी मर्यादीत नाही, मुंबईमध्ये नीट रस्ते नाहीत. पार्किंग व्यवस्था नाही. शहराचा पूर्ण विचका झाला आहे.  मुंबईसह मेट्रो शहरात उंच इमारती उभ्या राहत आहेत, रस्ते नाहीत, लोकं वाढल्याने पार्किंगची व्यवस्था नाही. आग लागली तर बंब जायला वेळ नाही, बाहेरून येणारे लोंढे आहेत. कोण येतंय, कोण जातंय हे कळत नाही, असे विधान राज ठाकरे यांनी केले.  
(हेही वाचा – India Tour of England : इंग्लंडमध्ये पोहोचल्यावर भारतीय खेळाडूंचा पहिला सराव, काय काय घडलं?)
मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर कोण करतय?
“मुंबईत मोनोरेल, मेट्रो आहे, कोण काय वापरताय हे कोणी बघत नाही. शहर म्हणून कोणी बघायला नाही. त्यामुळे, केंद्र सरकारने रेल्वेच्या स्थितीकडे लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.

(हेही वाचा – “कोट्यवधींचा घोटाळा? जलसंपदा खात्यातील इंजिनिअर्सच्या बढत्या-बदल्यांना CM Devendra Fadnavis यांच्याकडून ‘ब्रेक’)

रेल्वेमंत्र्यांनी परिस्थिती सुधारावी, प्रचारामध्ये सर्वजण व्यस्थ असून शहरांकडे कोणाचेही लक्ष राहिलेले नाही. आपल्या देशात माणसांची किंमत राहिलेली नाहीये. रेल्वे दुर्घटनेनंतर सरकारने तातडीने लक्ष दिले पाहिजे. लोकलला दरवाजे लावले तर लोक गुदमरून मरतील. लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. असा एकही दिवस नाही की, रेल्वेमध्ये अपघात होत नाहीत. सकाळी साधारणपणे नऊच्या दरम्यान ही घटना घडली आहे.
लोकल अपघात- मृतांची नावे
राहुल संतोष गुप्ता (28 ) रा. दिवा,
सरोज केतन (23 ) रा. उल्हासनगर
मयूर शाह (50 )
मच्छीद्र मधुकर गोतरणे, वय-31 (पोलीस कॉन्स्टेबल)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.